Join us  

वाडियांचा टाटांविरुद्धचा ३,००० कोटींचा दावा मागे; टाटांनी तीन कंपन्यांमधून केले होते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:00 AM

यामुळे दुखावलेल्या रतन टाटांनी डिसेंबर, २०१६ मध्ये वाडिया यांंना टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स या तीन कंपन्यांच्या संचालक पदावरून दूर केले होते.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सूचनेचा आदर करत प्रख्यात उद्योगपती व बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला ३,००० कोटींचा मानहानी दावा आज परत घेतला.वाडिया यांनी हा दावा डिसेंबर, २०१६ मध्ये दाखल केला होता, सप्टेंबर, २०१६ मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांना बडतर्फे केले होते. त्यावेळी वाडिया यांनी सायरस मिस्त्री यांना पाठिंबा दिला होता. यामुळे दुखावलेल्या रतन टाटांनी डिसेंबर, २०१६ मध्ये वाडिया यांंना टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स या तीन कंपन्यांच्या संचालक पदावरून दूर केले होते. या घटनेमुळे आपली बदनामी झाली, असे समजून वाडिया मानहानी दावा दाखल केला होता.केले होते आवाहनगेल्या सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्या. शरद बोबडे यांच्या एकल पीठाने नस्ली वाडिया व रतन टाटा यांना उद्देशून आपण दोघेही मुरब्बी उद्योगपती आहात व आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज आहात, त्यामुळे हा विवाद आपसात तडजोड करून संपुष्टात आणावा, अशी सूचना केली होती. त्यामुळे आज वाडिया यांनी हा दावा परत घेतला आहे.

टॅग्स :सर्वोच्च न्यायालय