vodafone idea : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. तर काही कंपन्या एकमेकांमध्ये विलीन झाल्या. आता हाजावर मोजण्याइतक्यात कंपन्या बाजारात शिल्लक आहेत. जिओला आतापर्यंत एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल यांनी चांगलचं आव्हान दिलं. पण आता व्होडाफोननेही बाजारात अंबानी-मित्तल या दोघांशी स्पर्धा करण्याची तयारी केली आहे. व्होडाफोनने ५जी मध्ये उतरण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. वोडाफोनन ७५ शहरांसाठी हा प्लॅन आखला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेलला तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे.
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलकडे गेलेल्या ग्राहकांची घरवापसी करण्यासाठी व्होडाफोन आयडियाने आता कंबर कसली आहे. यासाठी नवीन ऑफर्ससह 5G मोबाइल ब्रॉडबँड सेवा सुरू करेल अशी अपेक्षा आहे.
व्हीआयची ७५ शहरांची रणनिती काय आहे?इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, व्होडाफोन आयडिया देशातील पहिल्या ७५ शहरांमध्ये १७ प्राधान्य क्षेत्रांमध्ये 5G लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी जास्त डेटा वापरल्या जाणाऱ्या शहरातही कंपनी ५ जी लाँच करू शकते. सध्या एअरटेल आणि जिओ ५जी सेवा मुख्य शहरांमध्ये देत आहे.
प्राइस वॉरमुळे मिळणार लाभ?व्हीआय आपल्या ५जी सेवेसह प्राइस वॉरमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुरुवातीला आपल्या प्लॅनच्या किमती इतर स्पर्धकांपेक्षा १५ टक्के कमी ठेवू शकते. ईटीच्या अहवालात म्हटले आहे की कंपनी 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. प्रवक्त्याने सांगितले की कंपनी आपल्या 4G कव्हरेजचा आणखी विस्तार करण्याची योजना आखत आहे. शक्य तितक्या लवकर प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
रिचार्जच्या किमती वाढल्यादिवसेंदिवस रिचार्ज आणि डेटाच्या किमती वाढतच चालल्या आहेत. जुलै २०२४ मध्ये जिओ आणि एअरटेलने शेवटची शुल्कवाढ केली होती. यामध्ये ५जी सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी किमान किंमत वाढवण्यात आली होती. आता मोफत ५जी सेवा वापरण्यासाठी तुम्हाला आणखी महागडा रिचार्ज करावा लागणार आहे.