Join us

'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:25 IST

Vodafone Idea Recharge Plan: या दिग्गज कंपनीनं आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्रीपेड प्लान जोडला आहे, जो युजर्सना अनेक फायदे देईल. हा प्लान अशा युजर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यांना वारंवार रिचार्जचा त्रास न होता दीर्घ वैधता आणि डेली डेटा हवा आहे.

Vodafone Idea Recharge Plan: व्होडाफोन आयडियानं (Vi) आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्रीपेड प्लान जोडला आहे, जो युजर्सना अनेक फायदे देईल. हा प्लान अशा युजर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यांना वारंवार रिचार्जचा त्रास न होता दीर्घ वैधता आणि डेली डेटा हवा आहे. आज आम्ही तुम्हाला व्हीआयच्या या प्लॅनबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

व्होडाफोन आयडियाचा २,३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान 

व्होडाफोन आयडियाच्या नव्या प्रीपेड प्लानची किंमत २,३९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यात १८० दिवसांची वैधता मिळणार असून ग्राहकांना दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटाही दिला जाणार आहे. याशिवाय युजर्संना दररोज १०० एसएमएसचाही लाभ मिळणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा समावेश आहे, जेणेकरून युजर्स कोणत्याही शुल्काशिवाय कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करू शकतात.

भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

ओटीटी आणि अन्य बेनिफिट्स

व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान एन्टरटेन्मेंटदेखील ऑफर करतं, ज्यामध्ये अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत अॅक्सेस दिला जातो. या प्लानमध्ये ZEE5, SonyLIV, Lionsgate Play, Playflix, Fancode आणि ManoramaMAX सारखे OTT चॅनेल समाविष्ट आहेत. यासोबत त्यांच्यासोबत चित्रपट, शो आणि लाइव्ह कंटेंटचा आनंद घेत राहू शकता. या स्कीममध्ये, ग्राहकांना बिंज ऑल नाईटचा फायदा देखील दिला जात आहे, जो रात्री अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधा देतो. याशिवाय, वीकेंड डेटा रोलओव्हर फीचर देण्यात येणार आहे, म्हणजेच तुमचा न वापरलेला डेटा वीकेंड मिळेल. याव्यतिरिक्त, डेटा डिलाईट वैशिष्ट्य मागणीनुसार बोनस डेटा देते.

३४० रुपयांचा प्लान

गेल्या महिन्यात कंपनीनं ३४० रुपयांचा प्लानही सादर केला होता. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. तसंच दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. डेली डेटा लिमिटनंतरही इंटरनेट सुरू राहतं, पण स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो. याशिवाय रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ग्राहक अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना वीकेंड डेटा रोलओव्हरचा ही लाभ दिला जातो. 

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)