Join us  

Video : देश सोडण्याआधी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो, विजय मल्ल्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 6:21 PM

किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणासंदर्भात आज ब्रिटेनच्या न्यायालयात सुनावणी झाली. लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात आज मल्ल्याने हजेरी लावली होती.

लंडन - किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणासंदर्भात आज ब्रिटेनच्या न्यायालयात सुनावणी झाली. लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात आज मल्ल्याने हजेरी लावली होती. यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार करण्यात आल्याचा व्हिडीओ कोर्टात दाखवला. मात्र, तत्पूर्वी हा व्हिडीओ कोर्टात न दाखविण्याची विनंती विजय मल्ल्याच्या वकिलांनी केली होती. तर देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो, अशी कबुली मल्ल्याने कोर्टात दिली.

भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या विजय मल्ल्याने आज वेस्टमिंस्टर कोर्टात हजेरी लावली होती. त्यावेळी आपण कुठलिही फसवणूक केली नसून किंगफिशरचे डबघाईला येणे हे व्यवसायिक अपयश आहे. तसेच मल्ल्या किंवा किंगफिशरने वाईट हेतुने बँकाकडे कर्जपुरठ्यासाठी अर्ज केल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे मल्ल्याच्या वकिलांनी कोर्टात म्हटले आहे. तर मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे विजय मल्ल्याने आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटले. दरम्यान, भारतीय तुरुंगांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करू नये, अशी मागणी मल्ल्याच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर, न्यायाधीशांनी भारतातील ऑर्थर रोड तुरुंगाचा व्हिडीओ मागितला होता. 

टॅग्स :विजय मल्ल्यालंडन