Join us

VI Cheapest data plan: केवळ १८१ रुपयांत डेटाचं टेन्शन संपणार, मनसोक्त चालवा इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 16:11 IST

जर तुमचा दैनंदिन इंटरनेटचा वापर जास्त असेल, तर Vi चा १८१ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

व्होडाफोन-आयडिया दूरसंचार कंपनी दीर्घ काळापासून तोट्याचा सामना करत आहे. Jio आणि Airtel द्वारे 5G नेटवर्क देशभरात लाँच करण्याचं काम सुरू आहे. पण Vi ने 4G रिचार्ज प्लॅनमध्ये काही बदल केले असून त्यामुळे Jio आणि Airtel ची चिंता वाढली आहे. व्होडाफोन-आयडियाकडून 4G नेटवर्क मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, आता कंपनीनं 181 रुपयांचा स्वस्त 4G रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

VI चा नवीन रिचार्ज प्लॅन 181 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये एकूण 30 दिवसांची वैधता देण्यात येतेय. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जात आहे. अशा प्रकारे, VI च्या 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 30 GB डेटा ऑफर केला जाईल. हा केवळ एक डेटा प्लान आहे, ज्यामध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाहीत. याचा अर्थ असा की तुम्हाला एक मुख्य कॉलिंग प्लॅन घ्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही Vi चा 181 रुपयांचा प्लॅन जोडू शकाल.

289 रुपयांचा प्लॅनया प्लॅनची ​​वैधता 48 दिवसांची आहे. एकूण 4GB डेटासह या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 600 SMS ची सुविधा देण्यात येत आहे.

429 रुपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये एकूण 78 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. हा प्लॅन एकूण 6GB डेटासह येतो. तसेच 1000 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.

401 रुपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये 50GB डेटासह दरमहा 3000 SMS देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये एकूण 200GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये SonyLiv मोबाइल सबस्क्रिप्शन 12 महिन्यांसाठी ऑफर केले जाते. यासोबत, ZEE5 प्रीमियम मूव्हीज आणि हंगामा म्युझिक सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)