नवी दिल्ली : एप्रिल २०२६ मध्ये देशातील वाहनविक्रीने २६.११ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवला आहे. विशेष म्हणजे, टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, पॅसेंजर व्हेईकल, कमर्शिअल व्हेईकल आणि ट्रॅक्टरविक्रीचे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. ग्रामीण भारतातील वाढती क्रयशक्ती, लग्नसराईमुळे वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे ‘फाडा’च्या अहवालातून स्पष्ट झाले.
ग्रामीण भागात मोठी मागणी
या वेळच्या विक्रीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वाहनांची मागणी अधिक आहे. प्रवासी वाहनांच्या श्रेणीत ग्रामीण भागातील विक्री २०.४० टक्क्यांनी वाढली, तर शहरी भागात ही वाढ ७.११ टक्के होती. चांगला रब्बी हंगाम, लग्नसराईचा हंगाम आणि ग्रामीण भागातील वाढती रोख सुलभता यांमुळे ही वाढ झाली आहे.
श्रेणी एप्रिल २०२६ एप्रिल २०२५ वाढ (%)
दुचाकी १९,१६,२५८ १६,९५,६३८ १३.०१
तीनचाकी १,०६,९०८ ९९,७४१ ७.१९
प्रवासी वाहने ४,०७,३५५ ३,६३,०२८ १२.२१
व्यावसायिक वाहने ९९,३३९ ८६,३६४ १५.०२
ट्रॅक्टर ७५,१०९ ६०,९५६ २३.२२
बांधकाम उपकरणे ६,३४८ ६,४९४ -२.२५
एकूण २६,११,३१७ २३,१२,२२१ १२.९४
श्रेणी शहरी वाढ ग्रामीण वाढ
दुचाकी १४.०७% १२.३०%
तीनचाकी ३.२२% १०.५३%
प्रवासी वाहने ७.११% २०.४०%
व्यावसायिक वाहने १०.२२% २०.२५%
ट्रॅक्टर १२.१२ २५.८८
एमजी कॉमेट ईव्ही ₹६०,०००
टाटा टियागो ₹१,००,०००
हुंदई आयोनिक५ ₹१,००,०००
एमजी झेडएस ₹१,९०,०००
टाटा कर्व्ह ₹३,००,०००
महिंद्रा एक्सयूव्ही ४०० ₹४,००,०००
दुचाकी वाहनांची विक्री १३.०१ टक्क्यांनी वाढून १९,१६,२५८ युनिटवर पोहोचली आहे. लग्नसराईमुळे दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, ट्रॅक्टरविक्रीत २३.२२ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असून, ही वाढ ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचे संकेत देत आहे.
वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रभाव अधिक वाढत आहे. थ्री-व्हीलर श्रेणीत ईव्हीचा वाटा आता ६०.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर प्रवासी वाहनांमध्ये ईव्हीचा वाटा ५.७७ टक्के आहे.
Web Summary : Indian vehicle sales hit a record 2.6 million in April 2026, driven by rural demand and weddings. Two-wheeler and tractor sales soared, indicating strong rural economy. Electric vehicles gain traction, especially in three-wheeler segment, holding over 60% market share.
Web Summary : भारत में वाहन बिक्री अप्रैल 2026 में 26 लाख के रिकॉर्ड स्तर पर पहुंची, जिसका कारण ग्रामीण मांग और शादियां रहीं। दोपहिया और ट्रैक्टर की बिक्री में तेजी आई, जो मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था का संकेत है। इलेक्ट्रिक वाहनों की लोकप्रियता बढ़ी, खासकर तिपहिया वाहनों में 60% से अधिक बाजार हिस्सेदारी।