Join us  

दसऱ्या दिवशीच वेदांता ग्रुपने घेतला मोठा निर्णय! कंपनी येणार फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 2:58 PM

शेअर्समध्ये वाढ होऊ शकते

वेदांता समुहाने आपल्या व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. अजय गोयल पुन्हा एकदा कंपनीत मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून परत येत आहेत. गोयल सहा महिन्यांपूर्वी बायजूच्या एडटेक फर्ममध्ये रुजू झाले होते. पण आता त्यांनी BYJU चा राजीनामा दिला आहे आणि ते वेदांतमध्ये परतले आहे. कंपनीने मंगळवारी दिलेली माहिती अशी, CFO सोनल श्रीवास्तव यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत वेदांतच्या तीन सीएफओंनी राजीनामा दिला आहे. 

गोयल यापूर्वी ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२३ या कालावधीत कंपनीचे सीएफओ होते. ३० ऑक्टोबर रोजी ते पुन्हा कंपनीत या पदाची सूत्रे स्वीकारतील.

वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी नुकतीच मोठ्या प्रमाणावर डिमर्जरची घोषणा केली होती. यानुसार वेदांत आपला व्यवसाय सहा वेगवेगळ्या युनिटमध्ये विभागणार आहे. कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. वेदांताच्या बोर्डाने सप्टेंबरमध्ये अॅल्युमिनियम, ऑइल आणि गॅस, पॉवर, स्टील आणि फेरस मटेरियल आणि बेस मेटलचे स्वतंत्र लिस्टेड कंपन्यांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. ही प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

गोयल यांचे वेदांतात पुनरागमन झाल्याने बुधवारी कंपनीच्या समभागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी, वेदांत लिमिटेडच्या शेअर्समध्ये BSE वर ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. गेल्या सत्रात कंपनीचा समभाग ७.६५ रुपयांनी घसरून २१५.०५ रुपयांवर बंद झाला. आज दसऱ्यानिमित्त बाजारपेठ बंद आहे. या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा टॉप ३४०.७५ रुपये आहे. २० जानेवारीला ही पातळी गाठली. त्याची ५२ आठवड्यांची किमान पातळी २०७.८५ रुपये आहे. २८ सप्टेंबर रोजी या किमतीत घसरण झाली होती.

वेदांत रिसोर्सेसची मूळ कंपनी यूकेमध्ये अडचणींचा सामना करत आहे. S&P ग्लोबल रेटिंग्सने देखील कंपनीचे रेटिंग B- वरून CCC पर्यंत कमी केले आहे. त्यांनी कंपनीला क्रेडिट वॉचमध्ये ठेवले आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनेही कंपनीचे रेटिंग कमी केले आहे. वेदांत रिसोर्सेसला २०२४ मध्ये २ अब्ज डॉलर आणि २०२५ मध्ये १.२ अब्ज डॉलर बॉन्डची परतफेड करायची आहे.

टॅग्स :व्यवसायवेदांता-फॉक्सकॉन डील