Join us  

वेदांताने शेअरधारकांना पुन्हा दिली आनंदाची बातमी! वर्षात दुसऱ्यांदा लाभांश वाटपाची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:22 AM

वेदांता लिमिटेडने चालू वर्षात दुसऱ्यांदा शेअरधारकांना आनंदाची बातमी दिली आहे.

वेदांता समुहाने शेअरधारकांना वर्षात दुसऱ्यांदा आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दुसऱ्यांदा लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. भागधारकांना प्रति शेअर ११ रुपये लाभांश मिळेल, जो १ रुपयाच्या दर्शनी मूल्याच्या शेअरच्या ११०० टक्के आहे. यामुळे कंपनीला अंदाजे ४०८९ कोटी रुपये वितरित करावे लागणार आहेत. कंपनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगला लाभांश वितरित करत आहे. कंपनीने २०२२ मध्ये १६६८९ कोटी रुपये आणि २०२१ मध्ये ३५१९ कोटी रुपयांचा लाभांश वितरित केला होता.

तांदूळ स्वस्त होणार! मोदी सरकारने कंपन्यांना भाव कमी करण्याचे आदेश दिले

मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स  सादर करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. एनसीडी लॉन्च करण्याचा निर्णय पुनर्वित्तीकरणासाठी घेतला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. लाभांश देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. लाभांश वितरणाची तारीख बुधवारी निश्चित केली जाईल. वेदांतने यापूर्वी मे महिन्यात प्रथमच लाभांश वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी एका शेअरवर १८.५० रुपये लाभांश दिला जात होता.

सोमवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स वाढीसह २६६ रुपयांवर बंद झाले. मंगळवारीही कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात ग्रीन सिग्नलवर दिसत आहेत. गेल्या महिन्यात वेदांताच्या शेअर्समध्ये सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचे मार्केट कॅप ९६,८७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २० जानेवारी २०२३ रोजी, ते ३४०.७५ रुपयांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, पण या वर्षी २८ सप्टेंबर रोजी कंपनीच्या समभागांनी २०७.८५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला.

वेदांत लिमिटेड ही वेदांत रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी आहे. ते तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह धातू, पोलाद, अॅल्युमिनियम आणि उर्जा क्षेत्रात काम करते. त्यांचा व्यवसाय भारत, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामध्ये पसरलेला आहे. VRL चे मुख्यालय ब्रिटनमध्ये आहे.

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलव्यवसायशेअर बाजार