बंगळुरूतील एका आयटी कंपनीने एकाच दिवशी ४० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याची घटना घडली आहे. या घटनेने कंपनीत खळबळ माजली. सोशल मीडियातही या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. अधिकचा पगार असणाऱ्यांची नोकरीही आता सुरक्षित नाही. सीए अर्पित गोयल यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर ही बातमी शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अर्पित यांनी म्हटलं की, माझा एक मित्र बंगळुरूतील अशा स्टार्टअप कंपनीत काम करत होता जिथे कंपनीने अचानक ४० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मित्राचा पगार ९२ लाख वर्षाला होता तरीही त्याची नोकरी गेली. हे सत्य आहे आणि नोकरी जाणे खरे आहे. या प्रकारामुळे नोकरी जाण्याची भीती आणखी वाढल्याचं दिसून येते असं त्यांनी सांगितले. ही केवळ एका व्यक्तीची बाब नाही. कंपनीने हटवलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असेही काही जण आहे ज्यांच्या आयुष्यात या निर्णयाने अचानक बदल होणार आहे. एक कर्मचारी लवकरच पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे एक महिला कर्मचारी गर्भवती होती आणि मॅटेरनिटी लिव्हसाठी ती अर्ज करणार होती. परंतु कंपनीच्या निर्णयाने तिचं पुढचे प्लॅनिंग उद्ध्वस्त झाले.
बऱ्याचदा स्टार्टअप कंपन्यांमध्ये सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना कामावर घेतले जाते. जेव्हा फंडिंग चांगली असते तेव्हा सर्व सुरळीत असते परंतु फंडिंग संपल्यानंतर वेगाने कपात केली जाते. हे भारतीय तंत्रज्ञान सेक्टरमधील कटू वास्तव आहे. सोशल मीडियावर या पोस्टवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नोकरी जाणे ही मोठी समस्या नाही तर खरी अडचण जेव्हा उच्च पगारावरील लोक मोठमोठे EMI भरतात आणि अचानक नोकरी जाते ही आहे. आता उच्च पगारावरील लोकांच्या नोकरीची गॅरंटी नाही असं युजर सांगतात.
दरम्यान, काही युजर्स कंपनीच्या धोरणांवर संतापले आहे. सध्या स्टार्टअप कल्चर म्हणजे कर्मचारी डिस्पोजेबलसारखे झाले आहेत. आधी वापर करा आणि मग फेकून द्या. अनेकांनी या पोस्टवर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. स्टार्टअप कंपनीत काम करणे जोखीमेचे असल्याचे अनेकांनी म्हटलं. कंपनीतून कपात करण्याचे निर्णय अत्यंत वेगाने आणि विना नोटीस घेतले जातात. नोकरीला लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात चांगली कंपनी, हाय पॅकेज म्हणजे स्थिर करिअर वाटायचे परंतु आता अचानक ले ऑफ सामान्य झाले आहे. भारतीय टेक कंपन्यांमध्ये हे प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतात. त्यामुळे सॅलरीच्या मागे धावणेच सर्व काही नाही. संतुलित आयुष्य आणि आर्थिक सुरक्षाही महत्त्वाची आहे.
Web Summary : A Bangalore IT startup laid off 40% of its employees, even those earning high salaries. The sudden decision impacted many, including expectant parents, highlighting the precarious nature of startup jobs and the risk of high-EMI burdens.
Web Summary : बेंगलुरु के एक आईटी स्टार्टअप ने 40% कर्मचारियों को निकाल दिया, जिनमें उच्च वेतन पाने वाले भी शामिल थे। अचानक लिए गए इस फैसले से कई लोग प्रभावित हुए, जिससे स्टार्टअप नौकरियों की अनिश्चितता उजागर हुई।