Join us

औषध कंपन्या संकटात? अमेरिकन टॅरिफचा सर्वांत जास्त परिणाम फार्मा क्षेत्रावर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:05 IST

छोट्या कंपन्या थेट व्यवसायातून बाहेर पडण्याची भीती; 'ऑटो'वर परिणाम नाही

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांच्या आयातीवर २ एप्रिलपासून 'जशास तसे' शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा गंभीर परिणाम भारतीय औषध उत्पादकांवर होण्याची शक्यता असून, यामुळे या कंपन्यांचा उत्पादनखर्च वाढेल कमी मार्जिनवर काम करणाऱ्या छोट्या औषध कंपन्यांवर याचा गंभीर परिणाम होण्याची भीती असून, यामुळे त्यांना विलीनीकरण करावे लागेल किंवा थेट व्यवसायातून बाहेर पडावे लागू शकते.

दुसरीकडे, अमेरिका ही छोटी निर्यात बाजारपेठ असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रावर त्याचा फारसा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. भारत हा प्रचंड प्रमाणात शुल्क आकारात असलेला देश असून, २ एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादणाऱ्या देशांवर शुल्क आकारले जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

२१९ अब्ज डॉलर्सची बचत अमेरिकन आरोग्य सेवा प्रणालीची भारतीय कंपन्यांच्या औषधांमुळे झाली.

भारताचा औषध उद्योग अमेरिकेवर अवलंबून 

१,३०० अब्ज डॉलर्सची बचत २०१३ ते २०२२ दरम्यान भारतीय औषधांमुळे अमेरिकेची झाली. पुढील पाच वर्षांत जेनेरिक औषधांपासून अमेरिकेची १३०० डॉलर्सची बचत होईल. 

भारताचा औषध उद्योग सध्या अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे आणि एकूण निर्यातीपैकी एक तृतीयांश वाटा अमेरिकेचा आहे.

टॅग्स :वैद्यकीयअमेरिका