Join us

Amazon सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट; या कार्डवर जबरदस्त ऑफर्स, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:38 IST

सणासुदीचा हंगाम जवळ आल्यानं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही आता निरनिराळ्या ऑफर्स येऊ लागल्यात.

सणासुदीचा हंगाम जवळ आल्यानं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही आता निरनिराळ्या ऑफर्स येऊ लागल्यात. अॅमेझॉननं २०२३ च्या सर्वात मोठ्या सेलची सुरुवात केलीये. हा अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale)आहे. प्राइम यूजर्ससाठी हा सेल शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू झालाय. त्याच वेळी, सामान्य युझर्ससाठी विक्री रविवार, ८ ऑक्टोबरपासून सुरू होईल. या सेलमध्ये मोबाईलपासून ते इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपर्यंत सर्वच गोष्टींवर भरघोस सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये, एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डवर (SBI Card Offer) १० टक्के विशेष सूट ऑफर केली जात आहे. तुम्ही कोणत्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता हे पाहू.बँक ऑफर्सअॅमेझॉनच्या ग्रेड इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये एसबीआयचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून ग्राहकांना तात्काळ १० टक्के सूट घेता येणार आहे. त्याच वेळी, Amazon Pay वर ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ५ टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक घेता येईल. याशिवाय नवीन कार्डसाठी अर्ज करणार्‍या युझर्सनाही 2500 रुपयांचं वेलकम रिवॉर्ड मिळेल.होम अप्लायन्सेस वर मोठी सूटअॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये घरगुती उपकरणं, टीव्ही आणि स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये, तुम्ही घरगुती उपकरणांवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. याशिवाय तुम्ही टीव्ही आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनएसबीआय