Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात बळीराजासाठी 'हाय-व्हॅल्यू' बूस्टर! 'या' पिकांच्या शेतीला सुगीचे दिवस; 'भारत विस्तार' योजनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:03 IST

Union Budget 2026 : या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांचा समावेश आहे. सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिला आहे. यंदाच्या बजेटमध्ये पारंपरिक पिकांऐवजी 'हाय-व्हॅल्यू' (उच्च मूल्य) पिकांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, पशुपालन आणि तंत्रज्ञानासाठी मोठी तरतूद केली आहे. विशेषतः काजू आणि चंदनाच्या शेतीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत.

१. 'हाय-व्हॅल्यू' पिकांवर भर : काजू आता 'प्रीमियम ब्रँड'

  • शेतकऱ्यांची कमाई वाढवण्यासाठी सरकारने काजू, अक्रोड, नारळ आणि चंदनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे.
  • काजूचा ब्रँड : भारतीय काजूला जागतिक स्तरावर 'प्रीमियम ब्रँड' म्हणून प्रस्थापित केले जाईल, ज्यामुळे निर्यातीत मोठी वाढ होईल.
  • चंदन शेती : चंदनाची शेती आणि कापणीनंतरची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रित काम करतील. भारताची ओळख पुन्हा 'चंदनाचा देश' म्हणून निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.

२. 'भारत विस्तार' : तंत्रज्ञानाची नवी क्रांती

  • शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी 'भारत विस्तार' उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
  • या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 'किसान कॉल सेंटर'ची थेट सेवा मिळेल.
  • API च्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज घरबसल्या मिळेल.
  • शेतीशी संबंधित प्रक्रिया शिकणे आणि सरकारी योजनांचा लाभ कोठपर्यंत पोहोचला, हे ट्रॅक करणे आता अधिक सोपे होणार आहे.

३. डोंगराळ भागातील शेतीला विशेष पाठबळहिमालयीन आणि इतर डोंगराळ भागांतील भौगोलिक आव्हानांवर मात करण्यासाठी अक्रोड, बदाम आणि जर्दाळू यांसारख्या पिकांच्या लागवडीसाठी विशेष योजना लागू केली जाईल. यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारेल.

वाचा - ITR भरणं होणार आता डाव्या हाताचा खेळ! १ एप्रिलपासून नवे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

४. पशुपालन आणि दुग्धव्यवसायातून रोजगार निर्मिती

  • ग्रामीण आणि निमशहरी भागातील पशुपालन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
  • पशुपालन क्षेत्रातील नवीन स्टार्टअप्सना पाठबळ देऊन रोजगार वाढवला जाईल.
  • शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून उत्पादन, वितरण आणि विक्री या साखळीत शेतकऱ्यांचा वाटा वाढेल.
  • पशुधन, डेअरी आणि कुक्कुटपालनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील अनुदानात वाढ प्रस्तावित आहे. 
English
हिंदी सारांश
Web Title : Budget Boosts Farmers: High-Value Crops & 'Bharat Vistar' Scheme Announced

Web Summary : Budget 2026 focuses on doubling farmer income through high-value crops like cashews and sandalwood. The 'Bharat Vistar' scheme will provide digital access and weather updates. Support for livestock and farming in hilly regions is also prioritized, aiming for increased rural employment.
टॅग्स :अर्थसंकल्प २०२६बजेट माहितीशेती क्षेत्रबजेट क्षेत्र विश्लेषण