Join us
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी कमी होणार का पेट्रोल-डिझेलचे दर? पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:08 IST

Hardeep Singh Puri On Fuel Price: देशात गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. 

Union Budget 2023: गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी देशात इंधनाच्या दरात कपात केलेली नाही, यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दर कमी करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना असं होण्याची फारशी आशा दिसत नाही. वाराणसीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हरदीप सिंग पुरी इंधना कंपन्यांना ही विनंती केली. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत आणि कंपन्यांची अंडर रिकव्हरी थांबली आहे, तर भारतातही तेलाच्या किमती कमी कराव्यात, असं ते म्हणाले. 

यासोबतच त्यांनी राज्य सरकारांनी पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील व्हॅट कमी न केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. मात्र, हरदीप सिंग पुरी यांना अर्थसंकल्पापूर्वी किंवा नजीकच्या भविष्यात तेलाच्या किमतीत कोणतीही कपात होताना दिसत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांचे भूतकाळातील नुकसान पाहता लवकरच पेट्रोलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा नाही, असं हरदीप सिंग पुरी यांचं मत आहे. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांना उत्पादनाच्या तुलनेत किंमती न वाढल्यानं मोठा तोटा सहन करावा लागला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याउल्लेखनीय आहे की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे कंपन्यांवरील दबाव कमी झाला आहे. परंतु मागील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. ते म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ घेऊनही इंधन कंपन्यांनी जबाबदारीने काम केलं आणि किरकोळ विक्रीच्या किमती वाढवल्या नाहीत. मात्र अधिक किमतीत कच्चं तेल खरेदी करावं लागल्यानं त्यांची उत्पादनाची किंमत मात्र वाढली. 

२१,२०१ कोटींचा तोटा“मला आशा आहे की तोटा भरून आल्यावर किमती कमी झाल्या पाहिजेत. आम्ही त्यांना दर स्थिर ठेवण्यास सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला होता. किमती स्थिर ठेवल्याने या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण २१,२०१.१८ कोटी रुपयांचा तोटा झाला. या नुकसानीची भरपाई अद्याप व्हायची आहे,” असं पुरी यांनी सांगितलं. जून २०२२ च्या अखेर कंपन्यांना पेट्रोलसाठी १७.४ रुपये आणि डिझेलवर २७.२ रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला होता.

टॅग्स :पेट्रोलडिझेलअर्थसंकल्प 2023