Join us  

Unemployment Rate India : कोरोनाचा कहर; बेरोजगारीचा दर वर्षाच्या उच्चांकी स्तरावर, गावांमध्ये वाढतंय नोकरीचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:47 AM

Coronavirus in India : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहे. उद्योग बंद असल्यानं पुन्हा एकदा बेरोजगारीचा दर Unemployment Rate वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. 

ठळक मुद्देसध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहे.उद्योग बंद असल्यानं पुन्हा एकदा बेरोजगारीचा दर वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. 

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध आणि लॉकडाऊनसारखे पर्याय निवडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोजगाराचं Jobs  संकट उभं ठाकलं आहे. लॉकडाऊनमुळे देशात बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा एका वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. Unemployment rate rises to 14 5 percent in week ending May 16 CMIE coronavirus second wave effectसेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालानुसार, १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर गेल्या आठवड्यात दुपटीने वाढून १४.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ७.२९ टक्के होता. तर यादरम्यान शहरी भागात बेरोजगारीचा दरही ११.७२ टक्क्यांवरून वाढून १४.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरी दुसरीकडे गेल्या वर्षी जून महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर विक्रमी १७.५१ टक्क्यांवर पोहोचला होता. गावांमध्ये सध्या बेरोजगारी वाढल्यानं १७ मे पर्यंत मनरेगा अंतर्गत ४.८८ कोटी लोकांनी रोजगार मागितला होता. यापैकी ४.२९ कोटी लोकांना रोजगार मिळाला. परंतु यापैकी ३.१४ कोटी लोकंच काम करण्यासाठी आले. यावर संसर्गाच्या भीतीनं कामगार कामासाठी बाहेर पडत नसल्याचंही दिसून येत आहे. 

सध्या बेरोजगारीच्या संकटातून बाहेर येणं थोडं कठीण होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे कंपन्या आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच काम करेल. नव्या नियुक्त्या कमी प्रमाणात होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. पीएफमधून ३.५ कोटी लोकांनी काढली रक्मक१ एप्रिलनंतर ३.५ कोटी लोकांनी १.२५ लाख कोटी रुपये काढले आहेत. जे २०१९-२०१० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. तेव्हा ईपीएफने ८१,२०० कोटी रूपयांचं सेटलमेंट केलं होतं. रिपोर्टनुसार १ एप्रिल २०२० ते १२ मे २०२१ या कालावधीत ३.५ कोटी श्रमिकांपैकी ७२ लाख श्रमिकांनी १८,५०० कोटी रूपयांच्या नॉन रिफंडेबल कोविड १९ फंडचा फायदा घेतला. सध्या देशात ६ कोटी ईपीएफओचे ग्राहक आहेत. मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारनं ईपीएफओ ग्राहकांना ७५ टक्के पीएफ बॅलन्स किंवा तीन महिन्यांचं वेतन (जे कमी असेल ते) काढण्याची परवानगी दिली होती. रिपोर्टनुसार पीएफमधील रक्कम काढण्यात १० टक्क्यांची तेजी दिसून आली. ईएमआय चुकवणाऱ्याचं प्रमाण वाढलंकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात ईएमआय न भरणाऱ्यांचं प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी वाढलं आहे. एनबीएफसीकडून ही माहिती देण्यात आली. कोरोनामुळे कलेक्शन एजंट्सना घरी पाठवता येत नसल्याची माहितीही एनबीएफसी कंपन्यांनी दिली. यामुळे ईएमआय चुकवण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती गंभीर झाल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. एनबीएफसीच्या म्हणण्यानुसार गेल्या महिनाभरात एनपीए खात्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच चेक बाऊन्ससारख्या प्रकरणांची संख्याही पाच टक्क्यांनी वाढली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानोकरीबेरोजगारीभारत