Join us  

Saving Account पेक्षा किती वेगळं Current Account, समजून घ्या फरक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 4:37 PM

पाहा काय असतो Savings Account आणि Current Account मध्ये फरक

ठळक मुद्देपाहा कोणाला सुरू करता येतं सेव्हिग आणि करंट अकाऊंट

Savings Account Vs Current Account : बँक खातं आता प्रत्येकासाठी एक महत्त्वाची गरज बनलं आहे. सॅलरी मिळवणारा कर्मचारी असेल किंवा शेतकरी, गृहणी, व्यवसायिक. प्रत्येकाचं बँकेत खातं नक्कीच असतं. अनेकदा आपण पाहतो सेव्हिंग आणि करंट अकाऊंटचा उल्लेख केला जातो. दोन्हीचा वापर भलेही पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी केला जात असेल. परंतु ही दोन्ही खाती सारखी नाहीत. यामध्ये बरंच अंतर आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.सेव्हिंग अकाऊंट हे कर्मचारी, महिन्याला पैसे कमावणारे किंवा बचत करणाच्या उद्देशानं कोणीही सुरू करू शकतो. सेव्हिंग अकाऊंट हे लहान मुलांच्या नावावरही सुरू केलं जाऊ शकतं. परंतु करंट अकाऊंट हे व्यावसायिकांसाठी असतं. याला स्टार्टअप, पार्टनरशिप फर्म, एलएलपी,  खासगी कंपन्या, पब्लिक लिमिटेड कंपन्या सुरू करू शकतात. सेव्हिंग अकाऊंटमध्ये लिमिटसेव्हिंग अकाऊंट हा एक डिपॉझिट अकाऊंट असतो. खातेधारकाला सेव्हिंग अकाऊंटमध्ये लिमिटेड ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी असते. परंतु करंट बँक अकाऊंट डेली ट्रान्झॅक्शन्ससाठी असतात. सेव्हिंग अकाऊंटवर खातेधारकांना व्याज मिळतं. परंतु करंट अकाऊंटवर व्याज दिलं जात नाही. काय आहेत नियम ?सेव्हिंग अकाऊंटप्रमाणेच करंट अकाऊंटमध्ये किमान रक्कम ठेवणं आवश्यक असतं. परंतु करंट खात्यात किमान रक्कम, सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत थोडी अधिक असते.परंतु करंट अकाऊंटमध्ये बॅलन्स ठेवण्याची कोणतीही जास्तीतजास्त मर्यादा नाही. पण सेव्हिंग अकाऊंटमध्ये ती असते. कराबाबत तरतूदकराबाबत सांगायचं झालं तर सेव्हिंग अकाऊंमध्ये जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं आणि ग्राहकांना व्याजातून मिळणारं उत्पन्न हे कराच्या कक्षेत येतं. सेव्हिंग अकाऊंटमध्ये व्य़ाजापासून मिळणारं उत्पनन हे १० हजारांपर्यंत असेल तर त्यावर व्याज लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५० हजार आहे. परंतु करंट अकाऊंटवर व्याज मिळत नाही. त्यामुळे कराचा प्रश्न उद्ध्भवत नाही.

टॅग्स :बँकपैसागुंतवणूक