Join us

UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:40 IST

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) तरुणांसाठी इंटर्नशिप ऑफर आणली आहे. यूआयडीएआय देशातील पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देत आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) तरुणांसाठी इंटर्नशिप ऑफर आणली आहे. यूआयडीएआय देशातील पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देत आहे. या कालावधीत इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना दरमहा २० ते ५० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळणारे. युआयडीएआयची ही इंटर्नशिप ऑफर टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, मास कम्युनिकेशन किंवा डेटा सायन्सशी संबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे.

यांना करता येणार अर्ज

यूआयडीएआयनं वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या इंटर्नशिप ऑफर काढल्या आहेत. B.Tech, बी.ई., B.Design सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीचे ६ महिने पूर्ण न झालेले विद्यार्थी यूआयडीएआयच्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. पीएचडीचे विद्यार्थीही या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.

१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

अर्ज कसा करावा?

यूआयडीएआय इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, आपण uidai@uidai.net.in मेल करू शकता आणि आपला अर्ज पाठवू शकता. इंटर्नशिप करण्यासाठी तुमच्या कॉलेजची एनओसी असणं गरजेचं आहे.

यूआयडीएआयची ही इंटर्नशिप ६ आठवड्यांपासून १ वर्षापर्यंत असू शकते. त्याचबरोबर इंटर्नकडे लॅपटॉप असणंही आवश्यक आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५ आहे. अशावेळी यासाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :आधार कार्डनोकरी