Join us

UBER ने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर! आता उधारीवर करता येणार प्रवास; कसा घ्यायचा फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:45 IST

Uber One Membership : तुम्ही जर ऑनलाईन टॅक्सी बुक करुन प्रवास करत असाल तर एक खुशखबरी आहे. उबर कंपनी ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आले आहे.

Uber One Membership : देशात डिजिटल क्रांती झाल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या. आता पूर्वीसारखं रस्त्यावर उभं राहून एसटीची वाट पाहावी लागत नाही. घरातूनच तुम्ही वाहन बुक करू शकता. तुम्हीही ओला, उबर सारख्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा वापरल्या असतील. जर तुम्ही उबरचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक चांगली ऑफर आणली आहे.  कंपनीच्या या उपक्रमाचा उद्देश देशभरातील लाखो प्रवाशांना बचत आणि फायदे मिळवून देणे आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी UBER one नावाने विशेष मेंबरशिप आणली आहे. यामध्ये सदस्यांना स्वस्तात प्रवासासह अनेक सुविधा मिळणार आहेत.

UBER one मेंबरशिपसाठी किती शुल्क आहे?बातम्यांनुसार, Uber One आपल्या मेंबर्ससाठी प्रीमियम, २४ तास ग्राहक सपोर्ट ऑफर करते. ही समर्थित सपोर्ट टीम असून समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात येणार आहे. ग्राहकांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही सेवा २४ तास कार्यरत असेल. Uber One सदस्यत्व २ प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. एक प्रति महिना १४९ रुपये आणि दुसरा वार्षिक १४९९ रुपये आहे.

मेंबरशिप प्रोग्रॅम उबरगो, प्रीमियर, एक्सएल, रिझर्व्ह, ऑटो, मोटो, इंटरसिटी, भाडे, शटल आणि पॅकेजसह सर्व Uber राइड पर्यायांवर उपलब्ध आहे. उबर वनच्या सदस्यांना प्रवासात प्राथमिकत देण्यात येते. उदा. एकच टॅक्सी दोघेजण बुक करण्याचा प्रयत्न करत असतील. तर आधी मेंबर असलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाते.

काय आहेत फायदे?Uber One सदस्यांना Uber क्रेडिट देखील मिळते. म्हणजे तुम्ही १५० रुपयांपर्यंत उधारीवर प्रवास करू शकता. तुम्हाला वार्षिक प्लॅनमध्ये रद्द करण्याची परवानगी देखील दिली जाते. Uber One आपल्या वापरकर्त्यांना Uber क्रेडिट आणि Zomato Gold सारखे मोफत सदस्यत्वाचा देखील लाभ देत आहे. यामध्ये चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी सेवांचाही समावेश आहे. हे क्रेडिट्स भविष्यातील ट्रिपमध्ये रिडीम देखील केले जातात.

 

टॅग्स :उबरटॅक्सीओला