Join us
Daily Top 2Weekly Top 5

UBER AIR: उबर अॅपवरुन बूक करता येणार उडणारी टॅक्सी; ३२० किमीचा स्पीड, कोणत्या शहरापासून सुरुवात होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:39 IST

UBER AIR: वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आता आकाशातील मार्ग खुला होणार आहे. पाहा काय आहे उबरचा प्लॅन.

UBER AIR: वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आता आकाशातील मार्ग खुला होणार आहे. Uber नं, या वर्षाच्या अखेरीस दुबईमध्ये 'Uber Air' नावानं एअर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल अशी घोषणा केली. या सुविधेअंतर्गत प्रवासी थेट उबर ॲपवरून 'जोबी एव्हिएशन'ची (Joby Aviation) ऑल-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी बुक करू शकतील. जेव्हा तुम्ही ॲपमध्ये तुमचं डेस्टिनेशन (Destination) टाकाल, तेव्हा तुम्हाला 'Uber Air' चा पर्याय दिसेल. बुकिंग केल्यानंतर उबरची कार तुम्हाला घरून पिक-अप करेल आणि एअर टॅक्सी स्टँडपर्यंत सोडेल, जिथून तुम्ही हवाई मार्गानं तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकाल.

शहरांमधील प्रवासाची पद्धत बदलणार

उबरचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर सचिन कंसल यांनी म्हटलं की, 'ॲडव्हान्स्ड एअर मोबिलिटी' शहरांमधील प्रवासाची पद्धत बदलू शकते. जोबी एव्हिएशनला आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस दुबईमध्ये त्यांच्या प्रवाशांना एअर टॅक्सीद्वारे उड्डाण करता येईल. ही टॅक्सी पूर्णपणे विजेवर चालते. यामध्ये एक पायलट आणि ४ प्रवासी बसू शकतात आणि याचा कमाल वेग ताशी ३२० किमी आहे.

खास डिझाइन आणि सुरक्षिततेचे दावे

उड्डाण करताना आवाजाची पातळी अत्यंत कमी असेल अशा पद्धतीने या टॅक्सीचं डिझाइन करण्यात आलं आहे. प्रवाशांना शहराचं सुंदर दृश्य पाहता यावं यासाठी यात मोठ्या खिडक्या देण्यात आल्यात. कंपनीचा दावा आहे की, ८०,००० किलोमीटरहून अधिक उड्डाण करून याची चाचणी घेण्यात आली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे. एकदा चार्ज केल्यावर ही टॅक्सी १०० मैलांपर्यंतचे अंतर पार करू शकते.

जागतिक स्तरावर विस्ताराची योजना

आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही सेवा न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, युनायटेड किंगडम आणि जपान सारख्या बाजारपेठांमध्येही सुरू केली जाऊ शकते. अमेरिकेत सेवा सुरू करण्यापूर्वी 'फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन' (FAA) ची मंजुरी मिळणे आवश्यक असेल. उबर आणि जोबी २०१९ पासून एकत्र काम करत आहेत. २०२१ मध्ये जोबीनं उबरच्या 'Elevate' विभागाचं अधिग्रहण देखील केलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Uber Air: Flying Taxi Service Coming Soon, Bookable via App

Web Summary : Uber Air launches in Dubai, offering electric air taxi service via the Uber app. Joby Aviation's taxis carry four passengers at 320 kmph. Future expansion includes New York and Japan, pending approvals.
टॅग्स :उबरटॅक्सी