Join us

तुर्की, इंडोनेशिया अन् स्पेन...अनेक देशांच्या GDP पेक्षा बिटकॉइनची किंमत वाढली, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:49 IST

जगातील टॉपच्या कंपन्यांनाही बिटकॉइनने मागे टाकले आहे.

Bitcoin : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत आणि मार्केट कॅपही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान Bitcoin ची किंमत 90 हजार डॉलर्सच्या जवळपास गेली, तर मार्केट कॅपने अनेक देशांच्या जीडीपीलाही मागे टाकले. Türkiye, Indonesia आणि Spain सारख्या देशांचा GDP बीटकॉइनपेक्षा मागे आहे. काही कंपन्यांचे मार्केट कॅपदेखील बिटकॉइनच्या एकूण बाजार मुल्याच्या तुलनेत खूप मागे पडले आहे. 

बिटकॉइन 90 हजार डॉलर्सवरजगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत 90 हजार डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. कॉइन डेस्क डेटानुसार, बिटकॉइनची किंमत $89,995.12 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. सकाळी बिटकॉइनच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. तर, अमेरिकन वेळेनुसार, आता 4:45 वाजता, बिटकॉइनची किंमत सुमारे 7 टक्क्यांच्या वाढीसह $87,741.89 वर व्यापार करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉइनच्या किमतीत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एका वर्षात 136 टक्के वाढ झाली आहे.

मार्केट कॅप किती ?बिटकॉइनच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. सध्या बिटकॉइनचे मार्केट कॅप 1.75 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. विशेष बाब म्हणजे बिटकॉइन ही जगातील 8वी सर्वात मोठी मालमत्ता बनली आहे. मंगळवारी बिटकॉइनने या प्रकरणात चांदीला मागे टाकले. चांदीचे मार्केट कॅप 1.73 ट्रिलियन डॉलर आहे. याशिवाय, क्रिप्टोकरन्सीचे एकूण मार्केट कॅप $2.94 ट्रिलियनवर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत बिटकॉइन आणि एकूणच क्रिप्टो मार्केटमध्ये वाढ झाल्यामुळे या दोघांच्या मार्केट कॅपमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

बिटकॉइनने या मोठ्या कंपन्यांना मागे टाकलेबिटकॉइनचे मार्केट कॅप जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त झाले आहे. बिटकॉइनने फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मला मागे टाकले आहे, ज्याचे मार्केट कॅप $1.472 ट्रिलियन आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाही मागे राहिली आहे. सध्या टेस्लाचे मार्केट कॅप $1.123 ट्रिलियन आहे. याशिवाय, जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेदेखील बिटकॉइनच्या मागे आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1.007 ट्रिलियन डॉलर्स आहे.

या देशांचा जीडीपीही मागे बिटकॉइनने केवळ चांदी किंवा काही कंपन्यांच्या मार्केट कॅपला मागे टाकून इतिहास रचलेला नाही. तर, अनेक देशांचा जीडीपीही मागे राहिला आहे. युरोपमधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या स्पेनचा जीडीपी बिटकॉइनच्या तुलनेत कमी झाला आहे. जगातील 15वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या स्पेनचा जीडीपी सध्या 1.73 ट्रिलियन डॉलर्स आहे. बिटकॉइनच्या तुलनेत इंडोनेशिया आणि तुर्किये सारख्या देशांचा जीडीपीही कमी आहे. सध्या इंडोनेशियाचा जीडीपी 1.4 ट्रिलियन डॉलरवर आहे, तर तुर्कीचा 1.34 ट्रिलियन डॉलर्सवर आहे. येत्या काही दिवसांत बिटकॉइनचे मार्केट कॅप ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोसारख्या देशांच्या जीडीपीलाही ओलांडू शकते.

टॅग्स :बिटकॉइनगुंतवणूक