Join us

पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:41 IST

Donald Trump Tariff : भारताने रशियाचं तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दबाव टाकत आहे. मात्र, स्वतः रशियासोबत व्यापर वाढत असल्याचे सत्य समोर आलं आहे.

Donald Trump Tariff : एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लादत असताना, दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा रशियासोबतचा व्यापार २०% वाढला आहे. हा धक्कादायक खुलासा खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलास्का येथील एका परिषदेत केला. यातून ट्रम्प यांचा दुपट्टीपणा समोर आल्याची टीका होत आहे.

पुतिन यांनी उघड केला अमेरिकेचं खरं रुप?१५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे झालेल्या शिखर परिषदेत पुतिन यांनी सांगितले की, "जेव्हा अमेरिकेत नवीन सरकार आले, तेव्हापासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढू लागला आहे. सध्या हा व्यापार कमी असला तरी, त्यात २०% वाढ झाली आहे." त्यांनी पुढे सांगितले की, यातून हे सिद्ध होते की अमेरिका आणि रशिया यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात व्यापार वाढलापुतिन यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतचा हा २०% व्यापार वाढ जानेवारी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर झाला आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लादले आहेत, जे २७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. याबद्दल भारतानेही यापूर्वीच अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.

भारताची नाराजी आणि प्रियंका चतुर्वेदींचा संतापव्लादिमीर पुतिन यांच्या या खुलास्यानंतर भारतात ट्रम्प यांच्या निर्णयावर मोठी नाराजी व्यक्त होत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय या निर्णयाला 'अन्यायकारक' म्हणत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारताचा तेल आयात हा बाजारपेठ आणि १४० कोटी लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यावर आधारित आहे.

शिवसेने ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही यावर संताप व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "पुतिन यांच्या मते, अमेरिका-रशिया व्यापार २०% वाढला आहे. युरोपियन युनियन आणि चीनही मोठ्या प्रमाणात रशियन तेल आयात करत आहेत, पण तरीही टॅरिफचा बोजा केवळ भारतावर का?" त्यांनी याला 'व्यापार नाही, तर निवडक गुंडगिरी' असे म्हटले.

वाचा - १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

युक्रेन युद्धावर चर्चा नाही, पण व्यापारावर झालीअलास्का शिखर परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेनमधील युद्ध थांबवण्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. पण, दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर सहमती दर्शवली, असे पुतिन यांनी सांगितले. ट्रम्प यांनीही ही चर्चा चांगली झाल्याचे म्हटले, पण काही मोठे मुद्दे मात्र अनुत्तरित राहिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकारशियाटॅरिफ युद्ध