Join us

"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:02 IST

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लावलं आहे. परंतु आता यावरुन त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लावलं आहे. परंतु आता यावरुन त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय. स्वतंत्र परराष्ट्र धोरण विश्लेषक आणि न्यू यॉर्क विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक एडवर्ड प्राइस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीकेचा बाण सोडलाय. "अर्थशास्त्र आणि राज्यकारभाराची काहीच समज नाही," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

भारतासोबतचं त्यांचं टॅरिफ वॉर २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी धोक्यात आणू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. "पूर्वी मला वाटायचं की ट्रम्प यांना अर्थशास्त्र आणि राज्यकारभाराची फारशी समज नाही, पण आता मला समजलंय की ते चुकीचं होतं. खरं तर, ट्रम्प यांना या गोष्टींची काहीच समज नाही," असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली.

सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?

भारताबाबतची टॅरिफ पॉलिसी योग्य नाही

भारताचं टॅरिफ धोरण योग्य आहे कारण विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जास्त टॅरिफ लादण्याची परवानगी आहे. अशा हालचाली भारताला चीन किंवा रशियाकडे नेऊ शकतात, असं प्राइस म्हणाले. हे सर्व एकत्रितपणे असा संदेश देतंय की पंतप्रधान मोदी, भारताकडे अनेक पर्याय आहेत याची आठवण करुन देत आहेत. त्यांनी भारताच्या नॉन अलाइनमेंटच्या दृष्टिकोनाकडेही लक्ष वेधलं, जो भारताने सुरुवातीपासूनच स्वीकारल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारताकडे अनेक पर्याय

ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाचं समर्थन करताना कबूल केलं की अमेरिकेचे भारताशी खूप चांगले संबंध आहेत. प्राइस यांनी असा युक्तिवाद केला की भारताचं टॅरिफ हे विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून त्याच्या स्थितीशी सुसंगत आहेत. धोरणात्मकदृष्ट्या, हा दृष्टिकोन प्रतिकूल आहे, जो भारताला रशिया आणि चीनच्या जवळ नेत आहे, असंही प्राइज म्हणाले. मोदी हे अतिशय हुशार आहेत. ते त्यांचे पत्ते खेळत आहेत आणि ते त्यांच्याकडे पर्याय असल्याची अमेरिकेला आठवण करुन देत आहेत," असं त्यांनी नमूद केलंय.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्धअमेरिका