Top 5 Scooters Under: येणाऱ्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आयुष्यातील मौल्यवान स्त्रीला एखादं गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे! केंद्र सरकारने नुकतीच ३५० सीसी पर्यंतच्या दुचाकी वाहनांवर लागणारा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे अनेक स्कूटर्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे तुम्ही स्कूटर भेट म्हणून देण्याचा विचार करू शकता.
या जीएसटी कपातीमुळे या फेस्टिव्ह सिझनमध्ये स्कूटर खरेदी करणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते आणि तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. आज आपण ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमधील ५ लोकप्रिय स्कूटर्स पाहणार आहोत, ज्या जीएसटी कपातीमुळे आणखी परवडणाऱ्या झाल्या आहेत.
८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमधील टॉप ५ स्कूटर्स
१. होंडा ॲक्टिवा होंडा ॲक्टिवा ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे.पूर्वी ८१,०४५ रुपये असलेली किंमत आता ७४,३६९ रुपयांपासून सुरू होते. (एक्स-शोरूम)
२. टीव्हीएस ज्युपिटरकिफायतशीर: मायलेज आणि कम्फर्टसाठी लोकप्रिय.पूर्वी ७७,००० रुपये असलेली किंमत आता ७२,४०० रुपयांपासून सुरू होते. (एक्स-शोरूम)
३. सुझुकी ॲक्सेस १२५उत्तम परफॉर्मन्स: १२५ सीसी सेगमेंटमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते.जीएसटी कपातीनंतर सुरुवातीची किंमत ७७,२८४ रुपयांपासून (एक्स-शोरूम).
४. हिरो डेस्टिनी १२५आधुनिक फीचर्स: स्टायलिश डिझाइन आणि आधुनिक फीचर्स असलेली स्कूटर.नवीन सुरुवातीची किंमत ७५,८३८ रुपयांपासून (एक्स-शोरूम).
५. होंडा डिओ ११०युवावर्ग आणि स्टाईल: तरुणाईमध्ये स्टायलिश डिझाइनमुळे लोकप्रिय.सुरुवातीची किंमत ६८,८४५ रुपयांपासून (एक्स-शोरूम). कमी बजेटमध्ये हा एक चांगला पर्याय आहे.
वाचा - GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
जीएसटी कपातीमुळे या स्कूटर्सच्या किमती कमी झाल्या असल्या तरी, खरेदी करण्यापूर्वी शोरूममध्ये जाऊन ऑन-रोड किंमत, उपलब्ध मॉडेल्स आणि ऑफर्सची सविस्तर माहिती घ्यावी. या सणासुदीच्या काळात शोरूमकडून इतरही काही आकर्षक ऑफर्स मिळू शकतात, ज्यामुळे तुमची बचत आणखी वाढेल.
Web Summary : Diwali gift idea! GST cuts make scooters affordable. Top 5 options under ₹80,000 include Honda Activa, TVS Jupiter, Suzuki Access 125, Hero Destini 125, and Honda Dio 110. Check showroom for on-road prices and festive offers.
Web Summary : दिवाली गिफ्ट आइडिया! जीएसटी कटौती से स्कूटर हुए किफायती। ₹80,000 से कम के टॉप 5 विकल्पों में होंडा एक्टिवा, टीवीएस जुपिटर, सुजुकी एक्सेस 125, हीरो डेस्टिनी 125 और होंडा डियो 110 शामिल हैं। ऑन-रोड कीमत और फेस्टिव ऑफर के लिए शोरूम में जांच करें।