Join us

Petrol Diesel Price: सरकारी कंपन्यांपेक्षा एक रुपये कमी दर! रिलायन्सनंतर या पेट्रोल, डिझेल विकणाऱ्या कंपनीने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:11 IST

देशातील सर्वात मोठी खासगी इंधन विक्रेते नायरा एनर्जीने सरकारी कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल १ रुपये प्रति लिटर कमी दराने विकण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने मोठा निर्णय घेतला आहे. नायरा एनर्जीने मंगळवारी जाहीर केले की, कंपनीने सरकारी तेल वितरण कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर १ रुपयांनी स्वस्त विकण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजनेही असाच निर्णय घेतला आहे.

२ हजारांच्या नाही ५०० रुपयांच्या नोटेने RBI चं वाढवलं टेन्शन! अहवालात झाला मोठा खुलासा

सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊनही किमती कायम ठेवल्या आहेत.

'स्थानिक वापर वाढवण्याच्या आणि स्थानिक ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने कंपनीने जून २०२३ पर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर १ रुपये सवलतीने विकण्याचा निर्णय घेतला आहेष असं नायरा एनर्जीकडून सांगण्यात आले आहे. 

नायरा एनर्जीचे देशभरात ८६,९२५ पेट्रोल पंप आहेत, जे देशाच्या एकूण पेट्रोल पंप नेटवर्कच्या ७ टक्के आहे. याआधी मे महिन्याच्या सुरुवातीस, तेल वितरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपीच्या संयुक्त उपक्रमाने सांगितले होते की कंपनीने पेट्रोल-डिझेलची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी तेल वितरण कंपन्यांच्या तुलनेत प्रति लिटर एक रुपयाने स्वस्त आहे.

गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरवरून ७५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे. खासगी तेल कंपन्यांचे दर कमी करून लोकांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेल