Join us  

LIC चे गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 5 दिवसांत केली 86000 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 4:29 PM

Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात LIC चे मार्केट कॅप 6,83,637.38 कोटी रुपयांवर पोहचले.

Top-10 Firms Market Cap: शेअर मार्केटमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात, पण कधी कोणता शेअर गुंतवणूकदारांचे नशीब बदलेल, हे सांगता येत नाही. असाच चमत्कार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या शेअर्सने केला आहे. एलआयसीच्या शेअरधारकांनी अवघ्या 5 दिवसांत 86,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE sensex) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे 2.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. तर, उर्वरित सहा कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना 1,06,631.39 कोटी रुपयांचा तोटा सहान करावा लागला.

LIC च्या शेअर्समध्ये वादळी वाढ एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला. केवळ 5 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये LIC मार्केट कॅपने 7 लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श केला, परंतु नंतर यात थोडी घट होऊन 6,83,637.38 कोटी रुपयांवर आला. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 86,146.47 कोटी रुपयांची वाढ झाली.

या कंपन्याही आघाडीवरएकीकडे एलआयसीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयही कमाईच्या बाबतीत पुढे राहिली. SBI MCap पाच दिवसात 65,908 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,46,365 कोटींवर पोहोचले. गेल्या आठवड्यात कमाई करणारी तिसरी सर्वात मोठी कंपनी टाटा समूहाची TCS होती. कंपनीच्या गुंतवणूकदारांना 61,435 कोटींचा फायदा झाला. या काळात कंपनीचे बाजार भांडवल 15,12,743 कोटी रुपये झाले. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनेही बंपर कमाई केली. रिलायन्सचे MCap 5,108 कोटी रुपयांनी वाढून 19,77,136 कोटी रुपयांवर पोहोचले.

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारएलआयसीशेअर बाजारगुंतवणूक