Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय-अमेरिकी ग्रीन कार्डसाठी मोहीम राबविणार , तीन लाख भारतीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:53 IST

प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी नागरिक ग्रीन कार्डचा अनुशेष दूर करण्यासाठी अमेरिकाव्यापी मोहीम राबविणार आहेत. ग्रीन कार्डच्या अनुशेषामुळे ३ लाख भारतीय अर्जदारांना फटका बसला आहे. या सर्व अर्जदारांकडे उच्च दर्जाची कौशल्ये आहेत.

वॉशिंग्टन : प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी नागरिक ग्रीन कार्डचा अनुशेष दूर करण्यासाठी अमेरिकाव्यापी मोहीम राबविणार आहेत. ग्रीन कार्डच्या अनुशेषामुळे ३ लाख भारतीय अर्जदारांना फटका बसला आहे. या सर्व अर्जदारांकडे उच्च दर्जाची कौशल्ये आहेत.नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘जीसी रिफॉर्मस् डॉट ओआरजी’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या नियमानुसार प्रत्येक देशाला ग्रीन कार्डचा ठराविक कोटा ठरवून देण्यात आला आहे. या नियमांचे काटेकोर पालन झाल्यास कौशल्ये प्राप्त भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्यास २५ ते ९२ वर्षे लागू शकतात. व्हाइट हाऊसने इमिग्रेशन सुधारणांचा तपशील काँग्रेस सभागृहाला सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर नवगठित संस्थेने अमेरिकाव्यापी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.‘जीसी रिफॉर्मस्’चे अध्यक्ष संपत शिवांगी यांनी सांगितले की, आम्ही आव्रजन धोरण प्रकरणाशी संबंधित फिजिशयनांच्या समूहाला समर्थन देत आहोतच, त्याचबरोबर अभियंते आणि अन्य व्यावसायिकांना ग्रीन कार्ड मिळण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.‘जीसी रिफॉर्मस्’च्या वतीने वेद नंदा यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी या मोहिमेला पाठिंबा देत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य किरण कुमार थोटा यांनी सांगितले की, ग्रीन कार्डला होणारी दिरंगाई दूर करण्याची गरज आहे. (वृत्तसंस्था)योगदान समजून घ्याइंडियन अमेरिकन फ्रेंडशिप फोरमचे चेअरमन जगदीश शर्मा यांनी सांगितले की, मोठा अनुशेष असल्यामुळे ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांत काम करीत असलेले अनेक गुणवंत कित्येक दशके ग्रीन कार्ड मिळण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. ‘द लँड आॅफ गांधी’ या चित्रपटाचे निर्माते प्रकाश वाधवा यांनी सांगितले की, अमेरिकेतील कुशल स्थलांतरितांचे योगदान समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्याला योग्य पातळीवर मान्यता मिळणेही आवश्यक आहे. ग्रीन कार्ड सुधारणांबाबत हाती घेण्यात आलेली मोहीम त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

टॅग्स :अमेरिकाअमेरिकाभारत