नवी दिल्ली - ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र ऑनलाइन व्यवहारांमध्ये होत असलेल्या वाढीबरोबरच या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहे. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना एका नव्या प्रकारच्या धोक्याबाबत इशारा दिला असून, यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात, अशी भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. या प्रकारामध्ये हॅकरकडून एखाद्या ग्राहकाला एक अॅप AnyDesk डाऊनलोड करण्यासाठी पाठवण्यात येतात. त्यानंतर हॅकर संबंधिताच्या मोबाइलवर आलेल्या नऊ आकडी कोडच्या माध्यमातून त्याचा फोन रिमोटवर घेतात. आरबीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे की, हॅकर्स ज्यावेळी हा अॅप कोड आपल्या मोबाइल फोनमध्ये टाकतो. त्यानंतर तो ग्राहकाकडून काही परवानग्या मागतो. ही प्रक्रिया इतर अॅपप्रमाणेच होते. त्यामुळे हॅकर्सला तुमच्या मोबाइलमधील सर्व प्रकारची माहिती मिळते. त्यानंतर तो तिचा गैरवापर करून ट्रान्झॅक्शन करू शकतो. याचा वापर यूपीआय किंवा ई वॉलेटसारख्या पेमेंटशी संबंधित मोबाइल बँकिंग अॅपच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शनसाठी होऊ शकतो.
सर्वसामान्यांचे हजारो कोटी धोक्यात, यूपीआयबाबत आरबीआयने बँकाना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 15:23 IST
ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
सर्वसामान्यांचे हजारो कोटी धोक्यात, यूपीआयबाबत आरबीआयने बँकाना दिला इशारा
ठळक मुद्देऑनलाइन व्यवहारांमध्ये होत असलेल्या वाढीबरोबरच या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीचे प्रमाणही वाढू लागले आहेयूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात, अशी भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे