Join us  

यंदा घर घेणे होणार महाग, किमती ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 5:45 AM

किमती ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज

नई दिल्ली : चालू  वर्षांमध्ये घरांच्या किमतीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संघटनेने व्यक्त केला आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने मालमत्तांच्या किमती वाढू शकतात.

क्रेडाईच्या अहवालानुसार, जवळपास ६० टक्के बांधकाम विकासकांना घरांच्या किमतीमध्ये ३० टक्के वाढीची आशा आहे. सर्वेक्षणाध्ये सहभागी झालेल्या २१ टक्के बांधकाम विकासकांनी यावर्षी घरांच्या किमतीमध्ये ३० टक्के वाढीची आशा व्यक्त केली आहे. इमारत बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या असून, यामुळे खर्चात वाढ झाली आहे. परिणामी घरांच्या किमतीही वाढणार आहेत. देशातील १,३२२ विकासकांचा या सर्वेक्षणामध्ये सहभाग होता.

व्यवसाय करण्याची सुलभता वाढली तर ९२ टक्के विकासक नवीन प्रकल्प सुरू करणार आहेत.  आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यवसाय सुलभ करण्यासाठी काही ठोस भूमिका घेतली तर विकासकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. हे सर्वेक्षण देशातील २१ राज्यात करण्यात आले. यात मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबादसारख्या शहरांचा समावेश होता.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन