Join us

Airtel चा हा प्लॅन आहे हिट! वर्षभर कॉलिंग-डेटाचं टेन्शन नाही, महिन्याला खर्च फक्त २९९ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 15:27 IST

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्लॅन्स आहेत.

टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. पण त्याचा २९९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन खूप लोकप्रिय होत आहे. २९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घेता येतो. हा प्लॅन देखील हिट आहे कारण या प्लॅनमध्ये मंथली प्लॅनपेक्षा अधिक फायदे दिले जातात. त्याची मंथली किंमत एअरटेलच्या इतर मंथली योजनांच्या तुलनेत कमी आहे.

२९९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युझर्सना एका वर्षाची म्हणजे सुमारे ३६५ दिवसांची वैधता ऑफर केली जाते. या प्लॅनचा महिन्याचा खर्च २९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जास्तीत जास्त २जीबी डेटा दररोज दिला जातो. तसंच अमर्याद  कॉलिंग, दररोज १०० एसएमएस दिले जातात.

२९९ रुपयांचा प्लॅनया २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा दिला जातो. हा प्लॅन २९ दिवसांच्या वैधतेसह येतो. जर तुम्ही हा प्लान १२ वेळा रिचार्ज केला तर तुमचा एकूण खर्च ३,५८८ रुपये होईल. तथापि, ऑफर केलेली एकूण वैधता ३३६ दिवसांची असेल. म्हणजे १२ वेळा रिचार्ज केल्यानंतरही एक वर्षाची वैधता मिळणार नाही.

कोणता प्लॅन बेस्ट?जर आपण २९९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनबद्दल आणि २९९ रुपयांच्या मंथली प्लॅनबद्दल बोललो तर, दोन्हीमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा आणि १०० SMS दररोजची सुविधा मिळते. पण २९९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये तुमचे ५८९ रुपये वाचतील. तसेच, २९ दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध आहे.

टॅग्स :एअरटेल