Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एकुलतं एक असं राज्य जेथील लोक भरत नाहीत इन्कम टॅक्स, ना स्लॅबचं टेंशन ना टॅक्स भरण्याचं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:55 IST

Why Sikkim is Exempt from Income Tax : आपण कधी ऐकलंय का की, देशात एक असं राज्य आहे जेथील लोकांना त्यांच्या कमाईवर टॅक्स भरावा लागत नाही? कदाचित अनेकांना हे माहीत नसावं.

Why Sikkim is Exempt from Income Tax : देशातील कोट्यावधी लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्या पैशातून सरकारद्वारे वेगवेगळी कामे केली जातात. जसं आपलं उत्पन्न तसा आपल्या टॅक्सचा आकडा वाढतो. तर एक ठराविक उत्पन्न असलेल्या लोकांना इन्कम टॅक्समधून सूट दिली जाते. टॅक्स भरणारे लोक दरवर्षी बजेटची वाट बघतात आणि अपेक्षा ठेवतात की, यावेळी तरी आपल्यावरील टॅक्सचं ओझं जरा कमी होईल. पण आपण कधी ऐकलंय का की, देशात एक असं राज्य आहे जेथील लोकांना त्यांच्या कमाईवर टॅक्स भरावा लागत नाही? कदाचित अनेकांना हे माहीत नसावं.

देशातील अनेक सुंदर राज्यांपैकी एक सिक्कीम हे एक असं राज्य आहे जेथील लोकांना त्यांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही. येथील स्थानिक लोकांवर इन्कम टॅक्स लागू पडत नाही. महत्वाची बाब म्हणजे हा काही आजचा निर्णय नाही. तर इतिहास आणि कायद्यासंबंधी एक जुना नियम आहे. 

काय आहे कारण?

भारतीय आयकर अधिनियमच्या कलम 10 (26AAA) नुसार, सिक्कीममधील मूळ लोकांना टॅक्स भरण्यापासून सूट देण्यात आलीये. असं असण्यामागचं कारण म्हणजे सिक्कीम साधारण ३३० वर्ष एक स्वतंत्र संस्थान होतं. नंतर १९७५ मध्ये याचा भारतात समावेश करण्यात आला. हे देशातील २२ वं राज्य ठरलं. या विलीनीकरणावेळी असं ठरवण्यात आलं होतं की, सिक्कीमच्या पारंपारिक टॅक्स व्यवस्थेत काडीमात्रही बदल केला जाणार नाही. याच कारणाने आजही तेथील स्थानिक लोकांना आपल्या उत्पन्नांवर टॅक्स भरावा लागत नाही.

कुणाला मिळते सुविधा?

तसं पहायला गेलं तर ही सूट काही सरसकट सगळ्यांना मिळते असं नाही. याचा फायदा मुख्यपणे सिक्कीममधील मूळ रहिवाशांना मिळतो. सोबतच असे लोकही यासाठी पात्र आहेत, जे लोक तिथे २६ एप्रिल १९७५ च्या आधीपासून राहतात. त्यांना मिळणारा पगार, त्यांचा बिझनेस किंवा व्याजातून होणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही.

कधी मिळत नाही सूट?

जर येथील एखादी व्यक्ती सिक्कीम सोडून देशातील एखाद्या दुसऱ्या भागात जाऊन सेटल होत असेल, तर त्यांना इन्कम टॅक्समधून सूट मिळत नाही. तेच जर सिक्कीममधील कुणी राज्याबाहेर कमाई करत असेल तर त्यांना त्यांच्या उत्पन्नावर सामान्य नियमांनुसार टॅक्स भरावा लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Sikkim: India's only state where residents are exempt from income tax.

Web Summary : Sikkim's residents are exempt from income tax due to a pre-merger agreement protecting their traditional tax system. This applies mainly to original residents and those settled before April 26, 1975, on income earned within Sikkim. The exemption doesn't apply if they settle elsewhere or earn income outside Sikkim.
टॅग्स :इन्कम टॅक्सइंटरेस्टींग फॅक्ट्ससिक्किम