Join us
Daily Top 2Weekly Top 5

युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:07 IST

जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डीमन यांचा अमेरिकेला गंभीर इशारा. अति-कर, नियमांमुळे युरोपाप्रमाणेच अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरेल. फ्लोरिडा-टेक्सासचा दिला दाखला.

जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपी मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डीमन यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सध्या अमेरिकेतील काही राज्यांत आणि शहरांत जी 'व्यवसाय-विरोधी' धोरणे स्वीकारली जात आहेत, त्यामुळे अमेरिका युरोपाच्या मार्गावर जात असल्याचे डीमन यांचे म्हणणे आहे.

जेमी डीमन यांनी मायमी येथे आयोजित एका बिझनेस फोरममध्ये बोलताना सांगितले की, जर अमेरिकेने आपल्या धोरणांमध्ये तातडीने सुधारणा केली नाही, तर पुढील ३० वर्षांत अमेरिकेची अर्थव्यवस्था युरोपीय-शैलीतील घसरणीकडे जाईल.

युरोपने केलेल्या मोठ्या चुकीकडे लक्ष वेधताना डीमन म्हणाले की, युरोपातील सरकारांनी कंपन्यांवर अवाजवी कर लादले आणि अति-नियमन केले. यामुळे कंपन्यांनी युरोपातून काढता पाय घेतला. याच धोरणांमुळे गेल्या १५ वर्षांत जागतिक जीडीपीमधील युरोपचा वाटा अमेरिकेच्या जीडीपीच्या ९० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

'व्यवसायाला मारहाण' केल्यास गरीबांचे नुकसान

डीमन यांनी स्पष्ट केले की, 'व्यवसायाला मारहाण करणे' किंवा श्रीमंत आणि कॉर्पोरेशन्सवर जास्त कर लावणे, हे धोरण तात्पुरते चांगले वाटू शकते, परंतु यामुळे कर-आधार कमी होतो आणि अखेरीस याचा फटका कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच बसतो, ज्यांच्या फायद्यासाठी हे नियम आणले जातात.

त्यांनी डेमोक्रॅट-नेतृत्वाखालील शहरांना 'ब्लू टेप' (अनावश्यक सरकारी नियम) कमी करण्याची आणि व्यवसायाला आकर्षित करण्याची विनंती केली. फ्लोरिडा आणि टेक्सास या राज्यांनी व्यवसाय-पूरक धोरणे राबवून वॉल स्ट्रीटवरील कंपन्यांना आपल्याकडे यशस्वीरीत्या कसे आकर्षित केले, याचे उदाहरणही त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Europe's mistake will impoverish US in 30 years: JP Morgan

Web Summary : JP Morgan CEO Jamie Dimon warns that 'business-unfriendly' policies could lead the US to European-style economic decline. He highlights Europe's excessive taxes and regulations as a cautionary tale, urging the US to reduce red tape and attract businesses to avoid a similar fate.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिका