Join us

Car Loan : कर्ज घेऊन कार घेण्याचा विचार करताय? लोन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 20:24 IST

Car Loan Interest Rate: नवीन खरेदी करताना बहुतांश जण लोनचाच विचार करतात. सर्वच बँकांमध्ये कार लोन सुविधा असतात. पण कोणत्या बँका कमी प्रोसेसिंग फीस घेताहेत जाणून घ्या. 

Car Loan Interest Rate All Bank: स्वतःची कार असावी. कारमधून ऑफिसला जाता यावं आणि घरच्यांसोबत स्वतःच्या कारने फिरायला जायचं, हे कुणाला नको असतं. पण, कार खरेदी करताना महत्त्वाचा प्रश्न असतो पैशाचा! हल्ली प्रत्येक बँक कारसाठी कर्ज देतात. पण चांगली कार खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. मग अशा वेळी कर्ज घेताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? 

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कार लोन हा तुमच्यासाठी सोयीचा पर्याय आहे. कार लोनचा कालावधी साधारणतः तीन ते पाच वर्षांचा असतो. तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार, कार लोन घेताना ते लवकरात लवकर कसे फिटेल, असाच विचार करा. कर्ज घेताना त्याचा कालावधी जास्त घेऊ नका, कारण त्यामुळे व्याजाची रक्कम वाढते आणि तुमच्यावर त्याचा बोझा पडतो. 

कोणत्या बँकेचा व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस किती?

कार लोन घेण्यासाठी बँका वेगवेगळे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी आकारतात. काही प्रमुख बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस जाणून घ्या.

- युनियन बँक ऑफ इंडिया -8.70 टक्के ते 10.45 टक्के (प्रोसेसिंग फीस 1000 रुपये)

- पंजाब नॅशनल बँक - 8.75 टक्के ते 10.6 टक्के (प्रोसेसिंग फीस 1000 ते 1500)

- बँक ऑफ बडोदा - 8.95 टक्के ते 12.70 टक्के (प्रोसेसिंग फीस 2000)

- कॅनरा बँक - 8.70 टक्के ते 12.70 टक्के (प्रोसेसिंग फीस नाही)

- बँक ऑफ इंडिया - 8.85 टक्के ते 12.10 टक्के (प्रोसेसिंग फीस 1000 ते 5000)

- एसबीआय - 9.05 टक्के ते 10.10 टक्के (प्रोसेसिंग फीस नाही)

- आयसीआयसीआय बँक - 9.10 टक्क्यांपासून सुरूवात (प्रोसेसिंग फीस 2 टक्के)

कार खरेदी करता 'ही' गोष्ट लक्षात घ्या

जर तुम्ही या बँकांपैकी एका बँकेतून कार लोन घेतले, तर व्याजदर जास्त आहे, पण प्रोसेसिंग फीस नसल्यासारखीच आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर आर्थिक ताण कमी येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार लोन घेण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती आणि कार घेणे खरंच गरजेचे आहे का? याचा विचार करा. कार लोन घेताना कर्जाचा अवधी कमी ठेवा, त्यामुळे जास्त व्याज द्यावं लागणार नाही आणि तुमचे पैसे वाचतील.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रगुंतवणूकबँककार