Join us  

1 नोव्हेंबरपासून बदलणार 'या' गोष्टी, जाणून घ्या काय होणार नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:48 AM

1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नव नियम लागू केले जाणार आहेत.

नवी दिल्लीः 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नव नियम लागू केले जाणार आहेत. ज्याचा सरळ सरळ प्रभाव आपल्यावर पडणार आहे. नोव्हेंबरमधल्या नव्या बदलांमुळे अनेकांना नुकसान सहन करावं लागू शकतं. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)चे ग्राहक असाल, तर एक नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचे व्याजदर बदलणार आहेत. बँकेच्या या निर्णयाचा जवळपास 42 कोटी ग्राहकांवर प्रभाव पडणार आहे. एसबीआयनं 9 ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती की, 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिटवर व्याजदर 0.25 टक्के घटवून 3.25 टक्के करण्यात आलं आहे. तसेच 1 लाखांहून जास्त डिपॉझिट केलेली रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात आलं आहे. सध्या हा व्याजदर 3 टक्के मिळतो. नव्या नियमानुसार, 50 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. अशा पद्धतीनं व्यावसायिकांनी पेमेंट केल्यास त्यांच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमसाठी अर्ज करावा लागणार आहे. बँकेचं नाव, पूर्ण पत्ता, पॅन, रजिस्ट्रेशन डिटेल्स इमेल्समधून पाठवावी लागणार आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत dirtp14@nic.in या इमेलवर माहिती पाठवू शकता. सरकारनं या घोषणेनंतर प्राप्तिकर अधिनियमाबरोबरच पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम अ‍ॅक्ट 2007मध्ये संशोधन केलं आहे. सीबीडीटीनं एका सर्क्युलरमध्ये सांगितलं आहे की, या नियमाची 1 नोव्हेंबर 2019पासून अंमलबजावणी होणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे. नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी 9 वाजता उघडतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील. या बँका ग्राहकांसाठी बँकांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे, तर व्यापारी क्षेत्रातील खातेदारांच्या कामकाजाची (कमर्शियल एक्टिविटी) वेळात बदल करण्यात आला आहे. या व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांसाठी कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, संध्याकाळी 6 वाजता बंद होणार आहेत, तर उर्वरित सर्व बँकिंगच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

टॅग्स :पैसा