Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' सुविधांमुळे तुमचा खिसा होतोय रिकामा; जाणून घ्या ‘कॉस्ट क्रीप’चा धोका, छोट्या खर्चाचे काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:03 IST

बजेट बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे 'खर्च केल्यानंतर होणारा पश्चात्ताप'. हे टाळण्यासाठी दर आठवड्याला आपल्या खर्चाचे 'साप्ताहिक ऑडिट' करा.

ऑनलाइन फूड ऑर्डर, क्विक कॉमर्स, कॅब बुकिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्म... आजच्या धावपळीच्या युगात या सुविधा आता चैनीच्या नसून गरज बनल्या आहेत. या सेवांमुळे वेळ वाचतो आणि जीवन सोपे होते, हे खरे असले तरी, या बदल्यात आपण जी किंमत मोजत आहोत ती अनेकदा आपल्या नजरेतून निसटते. यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत 'कॉस्ट क्रीप' असे म्हटले जाते. हे छोटे खर्च तुमच्या बचतीला हळूहळू वाळवीसारखे पोखरत आहेत.

अनेकदा आपल्याला वाटते की, आपण वायफळ खर्च करत नाही. मोठ्या खरेदीचा किंवा ट्रिपचा हिशोब आपण ठेवतो, पण २४९ रुपयांचे लंच किंवा १९९ रुपयांचे ॲप सबस्क्रिप्शन विसरून जातो. हे छोटे खर्च जेव्हा दर महिन्याला आपोआप वजा (ऑटो-रिन्यू) होतात, तेव्हा त्यांची एकूण रक्कम मोठी होते. ही वारंवार होणारी छोटी खरेदी हळूहळू तुमची बचत कमी करते आणि बजेट कोलमडते.

अदृश्य खर्चाचा विळखाउदाहरणादाखल फूड डिलिव्हरीचा विचार करा.  प्लॅटफॉर्म फी आणि डिलिव्हरी चार्जेसची रक्कम दिसायला छोटी असली, तरी वार्षिक पातळीवर ती तुमच्या बजेटवर मोठा परिणाम करते.

बचतीसाठी ‘हे’ करा उपाय :छोट्या खर्चावर नजर : महिन्याचा बँक स्टेटमेंट तपासून वारंवार होणारे छोटे खर्च ओळखा. त्यावर नियंत्रण ठेवाल.सबस्क्रिप्शनची समीक्षा : ज्या ॲप्सचा वापर कमी आहे, त्यांचे सबस्क्रिप्शन त्वरित बंद करा. यामुळे पैसे वाचतील.खरेदीपूर्वी थांबा : एखादी गोष्ट घेण्यापूर्वी स्वतःला विचारा - "यासाठी मी थोडी जास्त मेहनत घेऊ शकलो असतो का?" यामुळे भावनेच्या भरात होणारा खर्च टाळता येईल. प्रत्येकवेळी हा विचार कराल.स्थानिक खरेदीवर भर : किराणा सामान किंवा जेवण ऑनलाइन मागवण्याऐवजी स्थानिक दुकानातून घेण्याचा प्रयत्न करा.बजेट अलर्ट : क्रेडिट कार्ड किंवा बँक ॲपमध्ये खर्च मर्यादेचे (स्पेंडिंग लिमिट) अलर्ट लावा. यामुळे खर्चावर नियंत्रण राहते.

नेमकी कशी लावाल शिस्त?बजेट बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे 'खर्च केल्यानंतर होणारा पश्चात्ताप'. हे टाळण्यासाठी दर आठवड्याला आपल्या खर्चाचे 'साप्ताहिक ऑडिट' करा. जेवढ्या सुविधा जास्त, तेवढा खिशाला कात्री जास्त, हे सूत्र लक्षात ठेवून जीवनशैलीत थोडा बदल केल्यास तुमची आर्थिक गळती थांबू शकते. खर्चाची नियमित समीक्षा केवळ पैशांची बचत करत नाही, तर तुम्हाला विनाकारण लागलेली ऑनलाइन खरेदीची सवय मोडून काढण्यास मदत करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Small expenses empty your pocket: Understand 'Cost Creep' and solutions.

Web Summary : Convenience costs add up! Track small expenses like subscriptions and food delivery. Review subscriptions, buy local, set spending alerts, and conduct weekly audits to control spending and save money.