नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु याच १ तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. पेन्शन फंडातून पैसे काढण्याच्या नियमात बदल पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) बदलेले नियम १ तारखेपासून लागू होतील. मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे विवाह, घरबांधणी किंवा फ्लॅटखरेदीसाठी फंडातून आंशिक स्वरूपात रक्कम काढता येईल.
मायक्रोसॉफ्टची सेवा महागणार कंपनीने मायक्रोसॉफ्ट ३६५ आणि डायनॅमिक्स ३६५ सह ऑनलाइन सेवांचे दर १ फेब्रवारीपासून ६ टक्क्यांनी वाढवले आहेत.
बल्क ई-मेलवर निर्बंधगुगल तसेच याहू आदी कंपन्यांकडून ग्राहकांना बल्क ई-मेल पाठवले जात असतात. दरदिवशी ५ हजारांहून अधिक ई-मेल पाठवणाऱ्या सर्व डोमेनला यापुढे आपले सर्व्हर ‘डीएमएआरसी’ या संरक्षण प्रोटोकॉलला अनुरूप करावे लागतील. स्पॅमचे प्रमाण ०.३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे लागेल. नियमांचे पालन न केल्यास ई-मेल स्वीकारले जाणार नाहीत तसेच बाउन्स होतील.