Join us

२८ रुपयांमध्ये होणार चार लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या Canara Bankच्या या खास स्कीमबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:28 IST

Canara Bank News: चार लाख रुपयांचे बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).

नवी दिल्ली - कॅनरा बँकेकडून आपल्या ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. अनेक ग्राहत असे आहेत ज्यांना याबाबत माहिती नाही आहे. आज आम्ही तुम्हाला दरमहा केवळ २८.५ रुपये जमा करून पूर्ण चार लाख रुपयांचा फायदा घेऊ शकता. जाणून घेऊया बँकेच्या या स्किमबाबत.

चार लाख रुपयांचे बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची रक्कम खूप कमी आहे. या दोन्ही स्कीममध्ये मिळून वर्षाला ३४२ रुपये जमा होतात.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्ग वार्षिक प्रीमियम ३३० रुपये आहे. या योजनेंतर्गत व्यक्तीला लाईफ कव्हर मिळते. जर विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यामधून ईसीएसच्या माध्यमातून घेतली जाते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना खूप कमी प्रीमियममध्ये जीवन विमा देते. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली PMSBY ही अशी स्कीम आहे. ज्याअंतर्गत केवळ १२ लाखांमध्ये खातेधारकाला दोन लाख रुपयांचे इन्शोरन्स कव्हर मिळते.

बँकेकडून जनधन ग्राहकांना ही सुविधा दिली जाते. बँक आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंत अॅक्सिडेंटल इन्शोरन्स कव्हरची सुविधा देत आहे. केंद्र सरकारने किमान गुंतवणुकीवर पेन्शन योजनेंतर्गत सरकार एक हजारपासून पाच हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शनची हमी दिली जाते. सरकारच्या या योजनेमध्ये ४० वर्षांपर्यंतच्या वयाच्या व्यक्ती अर्ज करू शकतात.  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रगुंतवणूक