Join us
Daily Top 2Weekly Top 5

आली चॉकलेटी रंगाची नवी नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:14 IST

कोणत्याही देशाची नोट असो वा नाणे, त्यावर असते त्या देशातील महत्त्वाची वास्तू, महापुरुष किंवा अजून एखाद्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याचे छायाचित्र. या नोटा, नाण्यांमधून त्या देशाची आर्थिक व सांस्कृतिक ओळखही होत असते.

मुंबई - कोणत्याही देशाची नोट असो वा नाणे, त्यावर असते त्या देशातील महत्त्वाची वास्तू, महापुरुष किंवा अजून एखाद्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याचे छायाचित्र. या नोटा, नाण्यांमधून त्या देशाची आर्थिक व सांस्कृतिक ओळखही होत असते. १० रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँक चलनात आणत असून, त्याही अशाच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या १० रुपयांच्या नोटांच्या मालिकेतील या नव्या नोट्या आहेत चॉकलेटी रंगाच्या.

या नोटेच्या एका बाजूस ओडिशातील कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिराचे चित्र असेल. दुसºया बाजूस महात्मा गांधी यांचे चित्र मध्यभागी असेल. तसेच उजव्या बाजूस अशोक स्तंभ, वॉटरमार्क, नंबर पॅनेल अशी वैशिष्ट्ये असतीलच. १० रुपयांच्या या नव्या नोटेवर स्वाक्षरी असेल रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची. या नोटेचे डायमेन्शन असेल ६३ एमएम बाय १२३ एमएम. नव्या नोटा आल्या तरी १० रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारत