Join us

Income Tax: 'देशात एकच आयकर पद्धती असणे गरजेचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 08:41 IST

Income Tax: एकच कर पद्धती अधिक योग्य राहील.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: भारतात सध्या २ आयकर पद्धती (इन्कम टॅक्स रेजिम) आहेत. मात्र, केंद्रीय वित्त मंत्रालयातील महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, देशात एकच आयकर पद्धती हवी.

'बिझनेस चेंबर पीएच.डी. हाऊस ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' या संस्थेच्या अर्थसंकल्प पश्चात सत्रास संबोधित करताना संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, देशात सध्या जुनी आणि नवी अशा २ आयकर पद्धती आहेत. मात्र, आढावा वर्ष २०२४-२५ मध्ये ७० टक्के करदात्यांनी नव्या आयकर पद्धतीनुसार आयकर विवरणपत्र दाखल केले आहे. त्यामुळे एकच कर पद्धती अधिक योग्य राहील.

टॅग्स :इन्कम टॅक्सआयकर मर्यादा