Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेपो रेटमध्ये पुन्हा कपातीची शक्यता, पतधोरण आढावा बैठक आज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 04:04 IST

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक उद्या, शुक्रवारी होत असून, त्यात पुन्हा एकवार रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक उद्या, शुक्रवारी होत असून, त्यात पुन्हा एकवार रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत सलग चार बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. उद्याच्या बैठकीतही तसाच निर्णय झाल्यास, ही पाचवी रेपो रेटमधील कपात असू शकेल. या बैठकीत पाव टक्क्याची कपात होण्याची शक्यता आहे. बँक गेल्या बैठकीत ३५ अंकांची कपात करण्यात आली होती. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास ग्राहकांनी घेतलेल्या कर्जांवरील व्याज कमी होईल आणि त्यामुळे लोकांच्या हातात पैसा राहिल्याने ते खर्च करतील. परिणामी बाजारपेठेत मागणी वाढेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्था