Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. एअरटेल आपल्या ग्राहकांना खूप चांगले रिचार्ज प्लान्स ऑफर करते. एअरटेलनं सर्व प्रकारच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. स्वस्त ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन तुम्हाला एअरटेलसोबत मिळतात.
आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच दोन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमतीत फक्त ३० रुपयांचा फरक आहे. अशावेळी या दोन्ही रिचार्ज प्लॅन्समध्ये किती फरक आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरेल. आम्ही एअरटेलच्या ६१९ आणि ६४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल बोलत आहोत. चला तर मग जाणून घेऊया दोन्ही प्लॅनच्या फायद्यांविषयी.
एअरटेलचा ६१९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या ६१९ रुपयांच्या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभही मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झाले तर युजर्संना या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो.
एअरटेलचा ६४९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या ६४९ रुपयांच्या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएसचाही लाभ मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झाले तर युजर्संना या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो.