Join us

व्यवसायात महिलांचा रुबाब! भारत जगात दुसरा; चीनपेक्षा दुप्पट संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 07:03 IST

महिला व्यावसायिकांच्या बाबतीत भारत जगातील टॉप-५ देशांत समाविष्ट झाला असून, भारताचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागला आहे.

नई दिल्ली : महिला व्यावसायिकांच्या बाबतीत भारत जगातील टॉप-५ देशांत समाविष्ट झाला असून, भारताचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन भारताच्या जवळपास बरोबरीत असला तरी मागील साडेतीन वर्षांत आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांची संख्या भारतात चीनपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

पुरुषांचा दबदबा कोणत्या क्षेत्रात?

मॅन्युफॅक्चरिंग व बांधकाम यांसारख्या अधिक नफा देणाऱ्या क्षेत्रात

महिलांना कुठे अडचण?

महिलांच्या नावावर मालमत्ता नसल्यामुळे त्यांना निधी उभारताना अडचणी येतात.

रिटर्नही अधिक : महिलांच्या मालकीच्या स्टार्टअप कंपन्यांचा गुंतवणुकीवरील परतावा (आरओआय) पुरुषांच्या कंपन्यांच्या तुलनेत ३५ टक्के अधिक राहिला असल्याचे बेन अँड कंपनीच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

ग्रामीण भागात ४५% महिलांनी आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुरू केला.

५.८५ कोटी एकूण उद्योजकांपैकी ८० लाख उद्योजक महिला आहेत.

२.२ ते २.७ कोटी लोक महिलांच्या कंपन्यांत काम करतात.

२० टक्के एमएसएमईच्या मालक महिला आहेत.

४० टक्के महिला नव्या व्यावसायिक संकल्पना देतात.

२०३० पर्यंत महिलांच्या मालकीच्या उद्योजकांच्या तीन कोटींपेक्षा अधिक नव्या कंपन्या सुरू होतील. त्यातून १५-१७ कोटी रोजगार येतील.

टॅग्स :व्यवसाय