नोकरीच्या काळात मेहनतीने पै अन् पै करुन जमा केलेले पैसे, बचत ही खरे तर निवृत्तीनंतरचा आधार असते. मात्र, काही चुकीच्या सवयी आणि आर्थिक नियोजनातील त्रुटींमुळे निवृत्तीनंतर हीच बचत झपाट्याने संपण्याचा धोका निर्माण होतो...
या संकटावर उपाय काय? भरपूर कव्हरेज असलेला आरोग्य विमा घ्या. नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करा.
आपत्कालीन निधी ठेवा, बजेट करा. ‘गरज’ आणि ‘हौस’ यामध्ये फरक करा.
घरातील सदस्यांना त्यांच्या गरजा स्वतः पूर्ण करायला शिकवा.सतत आर्थिक मदत मागणाऱ्या नातेवाईकांपासून योग्य अंतर ठेवा.
संकटाची कारणे कोणती?सेवानिवृत्तीनंतर आकस्मिक किंवा दीर्घकालीन आरोग्यविषयक खर्चांची शक्यता असते. पण योग्य नियोजन न केल्यास बचतीवर विपरीत प्रभाव पडतो.
लक्षात ठेवा, महागाई आणि बदलत चाललेली खर्चाची आवड यांच्या जोरावर, जीवनशैलीतील वाढत्या खर्चांमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेली बचत धोक्यात येऊ शकते.
घरकाम, आर्थिक आणीबाणी, इतर अचानक होणारे खर्च बचतीवर मोठा भार टाकू शकतात आणि गडबड होते.सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मजबूत योजना नसेल तर, तुमच्या बचतीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन होऊ शकणार नाही आणि पुढील काळात बचत शून्यावर येऊ शकते.