Join us  

जगातील टाॅपच्या अर्थव्यवस्था मंदीच्या हिंदाेळ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 5:56 AM

उगवत्या सूर्याचा देश जपान चाैथ्या स्थानी घसरला; सूर्यास्त न पाहणाऱ्या इंग्लंडला महागाईचा फटका

टाेकियाे/लंडन : जपान आणि इंग्लंड या जगातील दाेन प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मंदी आली आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत जपानचा आर्थिक विकासदर घटला आहे. असाच फटका इंग्लंडला बसला आहे. परिणामी जगातील पाच आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये जपानची चाैथ्या स्थानी घसरण झाली असून, मंदीच्याच संकटात असलेली जर्मनीची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आली आहे. गेल्या वर्षी जर्मनीलाही मंदीचा फटका बसला हाेता. 

जपानसमाेर सध्या कमकुवत येन हे चलन, घटती लाेकसंख्या, लाेकसंख्येचे सरासरी वाढते वय इत्यादी संकटांचे आव्हान आहे. २०१०मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेने दुसऱ्या स्थानी झेप घेऊन जपानला तिसऱ्या स्थानी ढकलले हाेते. सलग दाेन तिमाहीमध्ये मंदी जीडीपी घटल्यास तांत्रिकदृष्ट्या मंदी आल्याचे मानले जाते. जपानमध्ये मंदीचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्यावर्षी ऑक्टाेबरमध्ये दिले हाेते. (वृत्तसंस्था)

इंग्लंडमध्ये परिस्थिती काय?nवर्ष २०२०च्या पहिल्या सहामाहीनंतर प्रथमच ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. n०.३ टक्क्यांनी इंग्लंडमध्ये जीडीपी घट झाली २०२३च्या चाैथ्या तिमाहीत.nसेवा, औद्याेगिक उत्पादन आणि बांधकाम या तीन प्रमुख क्षेत्रांची कामगिरी खराब राहिली. 

भारताची व्यापारी तूट घटलीजगातील दाेन प्रमुख देशांमध्ये मंदी आली असली, तरी भारतातील स्थिती सुधारली आहे. देशातील आयात आणि निर्यातीचे आकडे जाहीर करण्यात आले. जानेवारीमध्ये निर्यात वाढली आहे. त्यामुळे व्यापारी तूट डिसेंबर २०२३च्या तुलनेत घटली आहे.

 

 

टॅग्स :जपानभारतइंग्लंड