Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:18 IST

America Economy Iran War: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. एकीकडे अमेरिकेचा आर्थिक वेग मंदावताना दिसत असताना, दुसरीकडे भारतासाठी मात्र चांगले दिवस आहेत.

America Economy Iran War: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. एकीकडे अमेरिकेचा आर्थिक वेग मंदावताना दिसत असताना, दुसरीकडे भारतासाठी मात्र चांगले दिवस आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था भारताची मजबूत स्थिती पाहून सातत्यानं विकासदराचा अंदाज वाढवत आहेत, जे जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक भक्कम अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर अवघा ०.५% राहिला, जो आधीच्या तिमाहींच्या तुलनेत अत्यंत कमकुवत आहे. पूर्ण वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ २.१% राहिला, जो २०२४ (२.८%) आणि २०२३ (२.९%) च्या तुलनेत घट दर्शवतो.

PNB च्या ४४४ दिवसांच्या FD मध्ये ₹२,५०,००० जमा केल्यावर किती मिळेल रिटर्न?भारतासाठी आली मोठी आनंदाची बातमी

जिथे अमेरिका दबावाखाली आहे, तिथे भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने पुढे जात आहे. 'एशियन डेव्हलपमेंट बँके'नं (ADB) आर्थिक वर्ष २०२६ साठी भारताचा विकासदर ६.९% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी 'वर्ल्ड बँक'नं देखील भारताचा विकासदर ७.६% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारताची मजबूत देशांतर्गत मागणी, सुधारलेली वित्तीय स्थिती आणि अमेरिकेकडून टॅरिफमध्ये केलेली कपात यांसारखे घटक या विकासाला पाठबळ देत आहेत.

मजबूत देशांतर्गत मागणी ठरतेय आधार

भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची देशांतर्गत मागणी आहे. डोमेस्टीक कन्झम्शन सातत्यानं मजबूत राहिल्यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्राला आधार मिळत आहे. याशिवाय, सरकारचे सुधारणावादी निर्णय, पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च आणि खाजगी गुंतवणूक देखील आर्थिक विकासाला गती देत आहेत.

ADB चा इशाराही महत्त्वाचा

एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असला तरी, काही जोखमींबाबत इशाराही दिला आहे. अहवालानुसार, पश्चिम आशियातील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. यामुळे महागाई वाढेल आणि आशियाई देशांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, जागतिक आर्थिक परिस्थिती कडक झाल्यामुळे कर्ज घेणं महाग होऊ शकतं, जे विकासासाठी आव्हान ठरू शकतं.

२०२७ साठी देखील सकारात्मक संकेत

एशियन डेव्हलपमेंट बँकेने आर्थिक वर्ष २०२७ साठी भारताचा जीडीपी ग्रोथ ७.३% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. युरोपियन युनियनसोबतचा संभाव्य व्यापारी करार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ आणि सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २०२७ साठी थोडा कमी, म्हणजेच ६.९% विकासाचा अंदाज वर्तवला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेचे संतुलन बदलत आहे का?

सध्याची परिस्थिती असे संकेत देत आहे की, जागतिक आर्थिक संतुलनात बदल होत आहे. एकीकडे जिथे अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था आव्हानांचा सामना करत आहे, तिथे भारतासारखे उदयोन्मुख देश वेगाने पुढे जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran war hits US economy; India sees 'Acche Din' continue.

Web Summary : Iran war strains US economy, slowing growth. India's economy thrives with strong domestic demand and rising growth forecasts from ADB and World Bank, signaling a shift in global economic balance.
टॅग्स :अर्थव्यवस्थाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर