Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कायद्याने पगार घसघशीत वाढणार, शिक्षण, हॉस्टेल भत्त्यात होणार मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:11 IST

देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या आयकर नियमांमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या ...

देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या आयकर नियमांमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, 'आयकर कायदा नियम मसुदा २०२६'मुळे (ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स) तुमच्या सॅलरी स्लिपचा चेहरामोहरा बदलणार आहे.

नव्या नियमांमुळे करपात्र उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार (टेक होम सॅलरी) लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

शिक्षण, हॉस्टेल भत्त्यात मोठी वाढ

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मान्य करत सरकारने मुलांच्या शैक्षणिक भत्त्यात (एज्युकेशन अलाउन्स) आणि वसतिगृह भत्त्यात (हॉस्टेल अलाउन्स) मोठी वाढ प्रस्तावित केली आहे.

एज्युकेशन अलाउन्स : दरमहा १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये प्रति अपत्य.

हॉस्टेल अलाउन्स : दरमहा ३०० रुपयांवरून ९,००० रुपये प्रति अपत्य.(एज्युकेशन अलाउन्स व हॉस्टेल अलाउन्स म्हणजे पालकांना आयकरात मिळणारी सवलत होय. सदर सवलत जास्तीत जास्त दोन अपत्यांसाठी घेता येते.)

फायदा किती : नव्या नियमांमुळे रमेशच्या वार्षिक करात १,३३,६६० रुपयांची बचत होईल आणि दरमहा त्याच्या हातात ११,१३८ रुपये जास्त येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Salary Hike Expected with New Law; Education, Hostel Allowance Boost

Web Summary : Millions of employees can expect higher take-home pay as the government plans income tax reforms. Education and hostel allowances are set to increase significantly, benefiting parents with tax savings up to two children.
टॅग्स :पगारइन्कम टॅक्सकेंद्र सरकार