Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:21 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : विविध सण, उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्या यामुळे जानेवारी २०२५ मध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र यातील काही सण व उत्सव स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्या कमी जास्त होतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे. 

दिनांक    सुट्टीचे कारण    कुठे?१ जानेवारी, बुधवार    नववर्षानिमित्त सुटी    देशभर२ जानेवारी, गुरुवार    मन्नान जयंती    केरळ५ जानेवारी    रविवार    देशभर६ जानेवारी, सोमवार    गुरु गोविंद सिंह जयंती    पंजाब, अन्य राज्यांत११ जानेवारी    दुसरा शनिवार    देशभर१२ जानेवारी    रविवार    देशभर१३ जानेवारी, सोमवार    लोहाडी सण    पंजाब, अन्य राज्यांत१४ जानेवारी, मंगळवार    मकर संक्रांत, पोंगल    तामिळनाडू, आंध्र प्रदेश१५ जानेवारी, बुधवार    टुसू पूजा    प. बंगाल व आसाम१६ जानेवारी, गुरुवार    उज्जवर तिरुनाल    तामिळनाडू१९ जानेवारी    रविवार    देशभर२३ जानेवारी, गुरुवार    नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती    अनेक राज्यांत२५ जानेवारी    चौथा शनिवार    देशभर२६ जानेवारी    रविवार व प्रजासत्ताक दिन    देशभर३० जानेवारी, गुरुवार    सोनम लोसार    सिक्किम 

टॅग्स :बँक