Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:36 IST

दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते, हे अनेकांना माहीत आहे. मात्र, सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर, सर्वात स्वस्त चांदी 'चिली' या देशात मिळते, असे मानले जाते. 

भारतात चांदीनेगुंतवणूकदारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच चकित केले आहे. आज (9 जनवरी 2026) चांदी सरासरी 2,54,000 रुपये प्रति किलो या उच्चांकी पातळीवर पोहोचली. यापूर्वी, सोन्यातूनच चांगला परतावा मिळतो, असा समज होता. मात्र आता चांदीही त्याच मार्गावर चालत आहे. गेल्या काही वर्षांत चांदीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. छप्परफाड परतावा दिला आहे.

गेल्या काही वर्षांत महागाई, जागतिक स्थरावरील अनिश्चितता आदी काही कारणांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळले आहेत. आधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्यांचा विश्वास केवळ सोन्यावरच होता. मात्र आता चांदीही गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून समोर येत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रांतील मागणी बरोबरच, गुंतवणूकदारांचा कलही चांदीकडे वाढताना दिसत आहे.

या देशांत प्रचंड स्वस्त आहे चांदी -दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते, हे अनेकांना माहीत आहे. मात्र, सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर, सर्वात स्वस्त चांदी 'चिली' या देशात मिळते, असे मानले जाते. 

रशिया आणि चिलीमध्ये किती रुपयांना मिळते 1 किलो चांदी? -गोल्ड ब्रोकरनुसार, चिलीमध्ये चांदीचा दर भारताच्या तुलनेत 30 ते 40 हजार रुपये प्रति किलोने कमी आहे. खरे तर, चिली चांदी उत्पादनाच्या मोठ्या केंद्रांपैकी एक आहे. यामुळे तेथे चांदीची किंमत फार कमी आहे. दुसऱ्या क्रमांकावर येतो रशिया, येथे चांदी भारताच्या तुलनेत 20 ते 30 हजार रुपये प्रति किलोने स्वस्त मिळते. यानंतर, तिसरा क्रमांक चीनचा लागतो. Silver price च्या अहवालानुसार, येथे 1 किलो चांदीची किंमत 2 लाख 21 हजार एवढी आहे. जी भारताच्या तुलनेत बरीच कमी आहे. यानंतर, ऑस्ट्रेलिया, पोलंड, अर्जेंटीना, बोलीव्हिया, मॅक्सिको, पोर्तगाल आणि अमेरिकेसारख्या देशांचा क्रमांक लागतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cheapest Silver Found Here: ₹40,000 Less Than India!

Web Summary : Silver prices soar in India, now ₹2,54,000 per kg. Chile offers the cheapest silver, ₹30-40,000 less. Russia and China also offer significantly lower prices due to high production.
टॅग्स :चांदीरशियाचीनगुंतवणूक