Join us  

‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 5:49 AM

पोस्ट पेमेंट बँकेची योजना, रक्कम पोस्टमन घरी आणून देणार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : तुम्हाला पैशांची गरज आहे; पण तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही. शेजारी किंवा मित्रही घरी नाहीत. अशा वेळी पोस्ट पेमेंट बँक तुमच्या मदतीला येऊ शकते. ‘आधार एटीएम सेवे’च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे मिळू शकतात.

‘आधार एटीएम’ ही सेवा एक प्रकारचे ‘एटीएम’च आहे. फक्त तुम्ही त्याचा वापर घरी बसल्या बसल्या करू शकता. योग्य कार्यवाही पार पाडल्यानंतर पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम देऊन जाईल. ही ‘आधार इनेबल्ड पेमेंट सर्व्हिस’ (एईपीएस) आहे. यात तुमचे बँक खाते आधार कार्डला जोडले जाते. यात रोख रक्कम काढणे, शिल्लक पाहणे, मिनी स्टेटमेंट मिळविणे या सुविधा मिळतात.

असे मिळतील पैसेnभारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाइटवर जा, ‘डोअर स्टेप’ पर्याय निवडा.nआपले नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आईडी, पत्ता, पिन कोड इ. माहिती भरा.nआता ‘आय ॲग्री’वर क्लिक करा. थोड्याच वेळात पोस्टमन पैसे घेऊन तुमच्या घरी येईल.

किती पैसे काढता येतील?nआधार एटीएमद्वारे १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. यात पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फक्त घरपोच सेवेचे शुल्क आकारले जाते. n‘आधार टू आधार’ पैसे हस्तांतरित करण्याचीही सोय यात आहे. आधार कार्डला अनेक बँक खाती जोडलेली असल्यास ज्या खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्याची निवड ग्राहकास करावी लागेल.

टॅग्स :आधार कार्डपोस्ट ऑफिसबँकिंग क्षेत्र