Join us  

मार्क झुगरबर्गला मागे टाकत टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती

By मोरेश्वर येरम | Published: November 19, 2020 9:35 AM

स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.

ठळक मुद्देएलन मस्क यांच्या संपत्तीत वर्षभरात सर्वाधिक वाढमुकेश अंबानींचाही श्रीमंतांच्या टॉप-१० यादीत समावेशजेफ बेजोस यांचं अव्वल स्थान कायम

करोनाच्या फेऱ्यात अनेक मोठ्या कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तर काही कंपन्यांना टाळंही लागलं आहे. पण दुसऱ्याबाजूला काही कंपन्यांना लॉकडाउनच्या काळात मोठी उभारी मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे. 

स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे एलन मस्क यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुगरबर्ग यांना मागे टाकलं आहे. 

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडे ११० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग १०४ अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. 

एलन मस्क यांच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली?एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं आहे. त्यानंतर एकाच दिवसात मस्कर यांच्या संपत्तीमध्ये ७.६१ अब्ज डॉलरची वाढ झाली. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला एसएंडपी ५०० कंपन्यांच्या यादीमध्ये सहभागी करण्यात आलं आहे. मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत तब्बल ८२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. 

एलन मस्क श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असले तरी यंदा वार्षिक संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झालेल्यांमध्ये ते अव्वल स्थानावर आहेत. मस्क यांच्या संपत्तीमध्ये ५०० श्रीमंत व्यक्तींच्या यंदा सर्वाधिक वाढ झाली आहे. एलन मस्क यांच्यानंतर दुसरं नाव अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांचं येतं. 

जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्ती कोण?१. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस- १८५ अब्ज डॉलर२. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स- १२९ अब्ज डॉलर३. टेस्ला, स्पेस एक्सचे एलन मस्क- ११० अब्ज डॉलर४. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग- १०४ अब्ज डॉलर५. एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट- १०२ अब्ज डॉलर६. बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट- ८८ अब्ज डॉलर७. गुगलचे के लैरी पेज- ८२.७ अब्ज डॉलर८. गुगलचे सर्जी ब्रिन- ८० अब्ज डॉलर९. मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बॉलमर- ७७.५ अब्ज डॉलर१०. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी- ७५.५ अब्ज डॉलर

टॅग्स :मार्क झुकेरबर्गफेसबुकमुकेश अंबानी