Join us

दूरसंचार कंपन्यांना करावे लागेल सुरक्षेचे ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 02:29 IST

संपूर्ण नेटवर्कचे माहिती सुरक्षा ऑडिट करून ऑक्टोबरअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दूरसंचार विभागाकडून दिले जाणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना आपल्या संपूर्ण नेटवर्कचे माहिती सुरक्षा ऑडिट करून ऑक्टोबरअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दूरसंचार विभागाकडून दिले जाणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.चीनकडून हेरगिरीसाठी दूरसंचार नेटवर्कमध्ये घुसखोरी केली जात असल्याच्या जागतिक पातळीवरील वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. आपले नेटवर्क ‘बॅकडुअर’ अथवा ‘ट्रॅपडुअर’ व्हायरसला (बग) बळी पडू शकते का, याची तपासणी या तांत्रिक आॅडिटमध्ये केली जाणार आहे, असे समजते. ‘बॅकडुअर’ आणि ‘ट्रॅपडुअर’ हे दूरसंचार हार्डवेअरमध्ये बसविले जाणारे बग आहेत.

>भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये चिनी उपकरणे मोठ्या प्रमाणात वापरली गेली आहेत. भारती एअरटेलच्या नेटवर्कमध्ये ३० टक्के, तर व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमध्ये ४० टक्के उपकरणे चीनची आहेत.