Join us
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या खर्चात ६५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:30 IST

मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या प्रशासकीय खर्चात ६५ टक्के घट झाली आहे.

मुंबई : मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या प्रशासकीय खर्चात ६५ टक्के घट झाली आहे. १० क्षेत्रात यामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. ‘टीमलीझ सर्व्हिसेस’ने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले.अलीकडे मनुष्यबळ विकास क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत आहे. कर्मचारी नियुक्ती, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची माहिती, सुट्ट्यांची मंजुरी आदी कामे मनुष्यबळ विकास विभागात होतात. ही कामे बहुतांश कंपन्यांमध्ये आज आॅनलाइन व डिजिटल पद्धतीने होतात. त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी झाल्याचे समोर आले आहे.